धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) – शिक्षण विभागाच्या माध्यमातून जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या ऑनलाईन अवैध बदल्या करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनोज खरे यांनी एका निवेदनाद्वारे दि.५ मार्च रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २०२३ मध्ये जिल्हा अंतर्गत विशेष संवर्ग भाग १ मधून बदल्या केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्र जिल्हा चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली समितीने नाकारले आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दि.७ जुलै २०२३ रोजी विशाल अंगद सुर्यवंशी व इतर शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली होती. त्या नोटीसीचे उत्तर २ दिवसांत न दिल्यास कारवाई करण्यात येईल असे सांगून देखील आजपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही.
याबाबत मनोज खरे यांनी संबंधित शिक्षकांवर काय कारवाई केली ? अशी माहिती माहिती अधिकारात विचारली असता त्यांना जाणून शिक्षण विभाग व मुख्य कार्यकारी अधिकारी हे टोलवाटोलवी करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे शिक्षकच बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीपर्यंत पोहोचून त्या शिक्षकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी खरे यांनी केली आहे.