इस्माईल काझी यांची राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक विभाग शहराध्यक्षपदी निवड

Spread the love

धाराशिव : धाराशिव शहरातील विश्रामगृह येथे दि ५ मार्च राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने अल्पसंख्यांक विभागाची पक्षाचे प्रदेश सचिव मसुद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तौफीक शेख यांच्या हस्ते इस्माईल काझी यांची अल्पसंख्यांक धाराशिव शहर पदी तर अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्षपदी बाबा फज्जोदुद्दीन यांची फेर निवड , तुळजापूर शहराध्यक्षपदी वाहेद शेख, तेर शहराध्यक्षपदी हकीम मुलानी यांची निवड यावेळी करण्यात आली आहे.



यावेळी मसूद शेख यांनी भाषणामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायच्या आहे. व येणाऱ्या काळात जास्तीत जास्त पक्षाचे ध्येय धोरण सर्वांपर्यंत पोहोचवून पक्ष बळकटी साठी प्रयत्न करा असे आवाहन उपस्थितांना केले



यावेळी प्रदेश सचिव मसुद शेख, जिल्हा उपाध्यक्ष कादर खान, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तौफीक शेख, जिल्हा अ.सं.सचिव शेख लईख, अन्वर शेख, वाजिद पठाण, ईल्यास पिरजादे, मुशर्रफ मुजावर, ,माजी नगरसेवक बाबा मुजावर, इब्राहिम इनामदार, काझी मसउद, मुलाणी हुकमअली, इरफान शेख , सैफन शेख , मसुद शेख, मुश्ताक कुरेशी, इरशाद कुरेशी, आझर पठाण, यांच्या सह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!