Dharashiv : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे हे धाराशिव-उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात जनसंवाद यात्रा करणार असून या यात्रेत ते 5 ठिकाणी जाहिर सभाव्दारे जनतेस संवाद साधणार आहे या जनसंवाद यात्रेचा दौरा खालील प्रमाणे आहे.
मा.उध्दवजी ठाकरे हे दिनांक 07 मार्च 2024 रोजी खाजगी विमानाने लातूर एअरपोर्ट येथे 12 वाजता पोहोचणार असून त्यानंतर 12.30 वाजता औसा येथे विजय मंगल कार्यालयात सभा घेणार आहेत व त्यानंतर लामजना, किल्लारी, नारंगवाडी पाटी, नाईचाकुर, कासारशिरसी, मुळज मार्गे उमरगा असा प्रवास करणार आहेत दिनांक 07 मार्च रोजी सायं. 4 वाजता उमरगा येथे कै. शिवाजी दादा मोरे क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी कॉलेज येथे सभा होणार आहे. यानंतर तुळजापूर येथे संध्याकाळी 7 वाजता डॉ आंबेडकर चौक, तुळजापुर येथे सभा होणार आहे त्यानंतर तुळजापुरची सभा संपल्यानंतर पुष्पक मंगल पार्क, धाराशिव येथे मुक्काम राहणार आहेत.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 08 मार्च रोजी पुष्पक पार्क, धाराशिव येथून आळणी फाटा, ढोकी येथे स्वागत होणार असून ते कळंबकडे प्रवास करणार असून कळंब येथील मार्केट यार्ड येथे 08 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सभा होणार आहे व त्यानंतर कळंबहून येरमाळा येथे स्वागत होणार असून कुसळंब, बार्शी बायपास मार्गे परंडा कडे प्रवास करणार आहेत परंडा येथे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत होणार असून ते परंडयाहून सोनारी कडे प्रवास करणार आहेत त्यानंतर अनाळा ,वालवड मार्गे भूम कडे प्रवास करणार आहेत व भूम येथे दि. 08 मार्च रोजी सायं. 04.00 वा. नगर पालीकच्या समोर चौकात सभा होणार आहे व सभा संपल्यानंतर भुमहून छत्रपती संभाजी नगर एअरपोर्ट कडे प्रवास करणार आहेत अशा प्रकारचा दौरा आहे. अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.