धाराशिव शहरातील कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेबाबत जानेवारी मध्ये जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन शहरातील कचरा व स्वच्छतेबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांना सूचना केल्या होत्या त्यावेळी नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले होते की एक फेब्रुवारीपासून शहरात सर्व स्वच्छता व कचरा व्यवस्थापन व्यवस्थित होईल मात्र तसे होताना दिसत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी पंधरा दिवसानंतर कामाचा आढावा घेऊ असे निश्चित केले होते त्यानुसार आज दि ५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ४ वाजता धाराशिव शहरातील स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला शहरातील नागरिक व नगरपालिकेतील सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
धाराशिव शहरातील कचरा व्यवस्थापना सोबतच स्वच्छता व शहरातील स्टेट लाईटचा शहरात समस्या निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शहरातील सिग्नल बंद आहेत. शहरात अनेक ठिकाणी वनवे सुरू करण्यात आले होते ते देखील बंद आहेत. शहरात पिण्याचे पाणी व्यवस्थित वितरण होत नसल्याची देखील नागरिकांची तक्रार आहे. शहरात ड्रेनेजचे काम सुरू असून ब्रिनेच्या कामामुळे अनेक रस्ते खराब झाले आहेत. जिल्हाधिकारी यांनी शहरात बॅनरवर बारकोड बंधनकारक केले होते मात्र त्याच्याकडे देखील नगरपालिका दुर्लक्ष करत आहेत तर शहरात अनेक चुकीच्या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात येत आहे. आजच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे काय निर्णय घेतात याकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
शहरातील कचरा व्यवस्थापन व स्वच्छता यासाठी जरी बैठक असली तरी शहरातील नागरिकांनी गेल्यावेळी देखील वरील सर्व समस्या बाबत प्रश्न उपस्थित केले होते यावेळी देखील उपस्थित करतील. नगरपालिकेच्या वतीने कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेबाबत नवीन ठेकेदाराला काम देण्यात आले आहे मात्र ठेकेदार बदलला मात्र शहरात जुनीच यंत्रणा काम करत असल्याने मोजक्या ठिकाणीच शहर स्वच्छ केल्याचे दाखविण्यासाठी तोंड पुसण्याचे काम होत आहे अशी प्रतिक्रिया “उस्मानाबाद न्यूज , अंतर संवाद न्यूज” शी बोलताना शहरवासी यांनी दिली आहे.