धाराशिव,दि.४ ( प्रतिनिधी ) राज्यातील ऊसतोड कामगारांचे व पर्यायाने त्यांच्या कुटुंबियाने जीवन अस्थिर व अत्यंत हलाखीचे असल्यामुळे त्यांचे जीवन सुखकारक करुन त्यांचे राहणीमान उंचावुन आयुष्य स्थिर व सुरक्षित करण्यासाठी ऊस तोडणी व्यवसायातील ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करण्यात आले आहे.या महामंडळाच्या माध्यमातुन ऊसतोड कामगारांच्या विविध योजना राबविल्या जात आहेत.त्यापैकी जिल्हयातील मयत ऊसतोड कामगार, वाहतुक कामगार व मुकादम यांचा अपघाती मृत्यु झालेल्या त्यांच्या वारसांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणेबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता.यानुसार शासनाने सद्यस्थितीत मयत ऊसतोड कामगार,वाहतुक कामगार व मुकादम यांचा अपघाती मृत्यु झालेल्या कुटुंबिय/वारसांना रक्कम रुपये ५ लाख इतकी मदत देण्यास मान्यता दिलेली आहे.
त्यानुसार आज ४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, धाराशिव येथे श्री.सुमंत भांगे,सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मुंबई व श्री.ओम प्रकाश बकोरिया,आयुक्त,समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य,पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच डॉ.दिनेश डोके,व्यवस्थापकीय संचालक, लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ,पुणे यांच्या दुरदृष्यप्रणालीद्वारे प्रमुख उपस्थितीत डॉ.श्री.सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी,धाराशिव यांचे हस्ते धाराशिव जिल्हयातील ७ मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखाचे आर्थिक सहाय्याचे धनादेश वाटप करण्यात आले.तसेच या कार्यक्रमासाठी श्री.बाबासाहेब अरवत,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण धाराशिव व अशोक मगर, अतुल जगताप समाज कल्याण निरीक्षक,युवराज चव्हाण,संकेत जगताप,सुरेश पवार,तुळजाभवानी कामगार संघटना,महाराष्ट्र राज्य इ. उपस्थित होते.