धाराशिव शहरात नगरपालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी विकास कामे करण्यात आली आहेत. नगरपालिकेने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे कामे होणे अपेक्षित असे मात्र ठेकेदारांकडून कोणत्याही नियमांचे पालन करण्यात येत नसून निकृष्ट दर्जाची कामे करण्यात येत आहेत. नगरपालिके हद्दीमध्ये सुरू असलेल्या कामांची तपासणी करण्याचे सर्व अधिकार बांधकाम अभियंता नगरपालिका यांना आहे मात्र ते देखील कसलेही प्रकारची यावर कारवाई करताना दिसत नाहीत.
शहरामध्ये अनेक ठिकाणी झालेली कामे दोन महिने ही झाली नाही तोपर्यंत रस्ते उघडण्यास सुरुवात झाली आहे तर नाल्यांची कामे देखील निकृष्ट दर्जाची झाली आहेत. अनेक ठिकाणी इस्टिमेट प्रमाणे कामे देखील झालेली नाहीत. शहरात अनेक ठिकाणी पाच वर्षानंतर विकास कामे सुरू आहेत मात्र निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने महिन्या दोन महिन्यात तीन महिन्यांमध्ये कामाची गुणवत्ता कोणत्या प्रकारची आहे हे दिसून येत आहे. तर शहरामध्ये अनेक ठिकाणी नाण्यांची रस्त्याची कामे सुरू आहे ती देखील कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, व निकृष्ट दर्जाची झालेली कामे पुन्हा करून देण्यात यावी, झालेल्या कामांची चौकशी करण्यात यावी, निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. वरी दाखविण्यात आलेले छायाचित्र शहरातील कचेरी , गडी स्कुल च्या रोडवरील आहे नालीवरील स्लाॅब कोसळले चित्र आहे हे काम दोन अडीच महिने अगोदर करण्यात आल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली आहे.