धाराशिव : दिनांक 03/03/2024 रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र धाराशिव UPHC-1 येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांच्या उपस्थितीत व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश हरिदास यांच्या उपस्थितीत फित कापून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आले.
या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला , जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी सर,राज्य नोडल अधिकारी डॉ. पुष्कर देशमुख लातूर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी, जिल्हा आयुष अधिकारी गजानन परळीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ विवेक होळे, वैद्यकीय अधिकारी डॉ खान, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका राठोड, तालुका आरोग्य सहाय्यक तानाजी क्षीरसागर जिल्हास्तरीय कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.