धाराशिव : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली कालरविवारदि.03.03.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 12 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला सुमारे 208 लि. गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 304 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर मद्य जप्त करुन त्यांची एकत्रीत किंमत अंदाजे 37,270 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 12 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1)नळदुर्ग पो. ठाणेच्या पथकाने 4 ठिकाणी छापे टाकले.आरोपी नामे-सचिन शिवराम इरवाडकार, वय 44 वर्षे, रा. चांभार गल्ली पो.हन्नुर ता. अक्कलकोट ह.मु. ईटकळ ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 13.10 वा. सु. हॉटेल पुणेरीच्या मोकळ्या जागेत अंदाजे 1,855₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 53 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. तर आरोपी नामे-भिमराव मछिंद्र बगाडे, वय 50 वर्षे, रा.ईटकळ ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 13.30 वा. सु. दत्ता फुटवेअर च्या पाठीमागे अंदाजे 5,065₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 49 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. तर आरोपी नामे-खंडेराव दाराप्पा बंडगर, वय 60 वर्षे, रा. ईटकळ ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 14.10 वा. सु. हॉटेल दर्शन चे बाजूला ईटकळ येथे अंदाजे 8,580 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 89 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. तर आरोपी नामे-संतोष बाबुराव पांढरे, वय 40 वर्षे, रा. शहापुर हनुमान गल्ली ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 18.30 वा. सु. शहापुर येथे पत्रयाचे टपरीसमोर अंदाजे 3,100 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 27 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
2)तामलवाडी पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले.आरोपी नामे-सुरेखा दिलीप सुरते, वय 50 वर्षे, रा. सांगवीकाटी ता. तुळजापूर जि. धाराशिव या 18.45 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 1,400 ₹ किंमतीची 15 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. आरोपी नामे-मैनाबाई शंकर पवार, रा. सावरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव या 20.50 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 900 ₹ किंमतीची 9 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
3)शिराढोण पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले.आरोपी नामे-ज्ञानेश्वर मंचक केदार, वय 21 वर्षे, रा. आंबलटेक ता. अंबेजोगाई जि. बीड ह.मु. खामसवाडी ता. कळंब जि. धाराशिव हे 15.30 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 805 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 23 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-परमेश्वर सटवा भोळे, वय 30 वर्षे, रा. निपाणी ता. कळंब जि. धाराशिव हे 17.00 वा. सु. तुळजाभवानी हॉटेलच्या बाजूस निपाणी पाटी येथे अंदाजे 735₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 21 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
4)धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकाने छापा टाकला. आरोपी नामे-वसीम वाजीद शेख, वय 30 वर्षे, रा. आयशा मस्जिद जवळ रसुलपुरा ह.मु. भिमनगर धाराशिव ता. जि. धाराशिवहे 20.00 वा. सु. भिमनगर धाराशिव येथे अंदाजे 5,280 ₹ किंमतीची 88 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
5)मुरुम पो.ठाणेच्या पथकाने छापा टाकला. आरोपी नामे-सिद्राम विठ्ठल बनसोडे, वय 50 वर्षे, रा. आनंदनगर ता. उमरगा जि. धाराशिवहे 17.15 वा. सु. मुरुम शहरात बसस्थानक समोर एका पत्रयाचे शेडसमोर मोकळ्या जागेत अंदाजे 1,700 ₹ किंमतीची 16 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
6)तुळजापूर पो. ठाणेच्या पथकाने छापा टाकला. आरोपी नामे-गणेश शंकर बचाटे, वय 44 वर्षे, रा. मंगरुळ ता. तुळजापूर जि. धाराशिवहे 18.30 वा. सु. कंचेश्वर साखर कारखान्याकडे जाणारे रोडलगत अंदाजे 1,120 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 32 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
7)ढोकी पो.ठाणेच्या पथकाने छापा टाकला. आरोपी नामे-नंदकुमार तुकाराम जाधव, वय 45 वर्षे, रा. जवळे दुमाला ता. जि. धाराशिवहे 18.15 वा. सु. वासुदेव शिंदे याचे पत्रयाचे शेडसमोर जवळे दुमाला येथे अंदाजे 6,730 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या व 80 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.