धाराशिव जिल्ह्यात 12 ठिकाणी जुगार विरोधी कारवाई
तुळजापूर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.12.02.2024 रोजी 21.40 वा. सु. तुळजापूर पो. ठा. हद्दीत हॉटेल दुर्गाच्या पाठीमागील खोलीत तुळजापूर येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)आकाश रमेश अमृतराव, वय 19 वर्षे, 2) जगदिश लिंबाजीराव साळुंके, वय 46 वर्षे, 3) मारुती नामदेव देवगुंडे, वय 65 वर्षे, 4) पंकज विष्णु कांबळे, वय 36 वर्षे, 5) नामदेव महादेव ढेरे, वय 34 वर्षे, 6) नंदकुमार अशोक जगताप, वय 44 वर्षे, रा. आण्णासाहेब नरसिंग अमृतराव सर्व रा. तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे सर्वजन 21.40 वा. सु. हॉटेल दुर्गाच्या पाठीमागील खोलीत तुळजापूर येथे तिरट जुगाराचे साहित्यासह 05 मोबाईल फोन, 02 मोटरसायकल असा एकुण 1,12,650 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले.यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.13.02.2024 रोजी 12.00 ते 13.00 वा. सु. आनंदनगर पो. ठा. हद्दीत 3 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)आनंद बबनराव खळदकर, वय 49 वर्षे, रा. गणेश नगर धाराशिव ता.जि. धाराशिव हे 12.00 वा. सु. राधिका दुकानाचे बाजूला शेडमध्ये पोलीस लाईन समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 3,750 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर 2)संतोष सदाशिव पवार, वय 50 वर्षे, रा. आगडगल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव हे 12.20 वा. सु. शिपा पानटपरीचे पाठीमागे आनंदनगर धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,200 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 3)राहुल उर्फ रोमीत नानासाहेब गुळवे, रा. आनंदनगर ता. जि. धाराशिव हे 13.00 वा. सु. पशुवैद्यकीय दवाखान्या समोर आंनदनगर येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 3,650 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.13.02.2024 रोजी 11.10 वा. सु. उमरगा पो. ठा. हद्दीत शैकत बागवान यांचे पानटपरीचे पाठीमागे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)शिवशंकर दिगंबर कांबळे, वय 53 रा. कवठा, ता. उमरगा जि. धाराशिव हे 11.10 वा. सु. शौकत बागवान यांचे पानटपरीचे पाठीमागे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,920 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलीसांनी दि.13.02.2024 रोजी 14.00 ते 15.40 वा. सु. ढोकी पो. ठा. हद्दीत 4 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)पोपट प्रल्हाद कांबळे, रा. जयभवानी नगर ढोकी ता. जि. धाराशिव हे 14.00 वा. सु. जुन्या पेट्रोलपंप पत्र्याचे शेडमध्ये कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह मोबाईल फोन एकुण 8,400 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 2)हनुमंत भाउराव बोंदर, वय 40 देवधानोरा ता. कळंब जि. धाराशिव, 3) महेश यादव रा. बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर हे दोघे 14.30 वा. सु. जुन्या पेट्रोलपंप पत्र्याचे शेडमध्ये कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,780 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 4)अंकुश उत्तम परसे, वय 36 वर्षे, रा. पेट्रोलपंप चौक ढोकी हे 15.00 वा. सु. साई हॉटेलचे पाठीमागे पत्रयाचे शेडमध्ये कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 7,400 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 5)प्रल्हाद आंबादास कांबळे, वय 46 वर्षे, रा. 6) जगदिश संभा ससाणे, 7) विजय मनोहर लोखंडे, वय 28 वर्षे, 8) सचिन भिमराव थोरात, वय 38 वर्षे, 9) दिगंबर विश्वनाथ वाकुरे, वय 60 वर्षे, सर्व रा. ढोकी हे 15.40 वा. सु. आंबराई ढोकी येथे झाडाखाली तिरट जुगाराचे साहित्यासह 04 मोबाईल फोन असा एकुण 23,450 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये ढोकी पो ठाणे येथे स्वतंत्र 4 गुन्हे नोंदवले आहेत.
बेंबळी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलीसांनी दि.13.02.2024 रोजी 12.05 ते 14.15 वा. सु. बेंबळी पो. ठा. हद्दीत 3 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)सईद अजिम शेख, वय 38 वर्षे, रा. बेंबळी ता. जि. धाराशिव 2)अब्दुलकवी खॉजामिया शेख, वय 42 वर्षे, रा.बेंबळी ता. जि. धाराशिव हे 13.10 वा. सु. बेंबळी आठवडी बाजार येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह मोबाईल फोन एकुण 360 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 3)शफीक उल्लअहमद शेख, वय 32 रा. बेंबळी ता. जि. धाराशिव, हे 14.15 वा. सु. बेंबळी आठवडी बाजार येथे जुगाराचे साहित्यासह एकुण 2,570 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.