धाराशिव जिल्ह्यात पाच ठिकाणी जुगार विरोधी कारवाई
तुळजापूर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.12.02.2024 रोजी 21.40 वा. सु. तुळजापूर पो. ठा. हद्दीत हॉटेल दुर्गाच्या पाठीमागील खोलीत तुळजापूर येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)आकाश रमेश अमृतराव, वय 19 वर्षे, 2) जगदिश लिंबाजीराव साळुंके, वय 46 वर्षे, 3) मारुती नामदेव देवगुंडे, वय 65 वर्षे, 4) पंकज विष्णु कांबळे, वय 36 वर्षे, 5) नामदेव महादेव ढेरे, वय 34 वर्षे, 6) नंदकुमार अशोक जगताप, वय 44 वर्षे, रा. आण्णासाहेब नरसिंग अमृतराव सर्व रा. तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे सर्वजन 21.40 वा. सु. हॉटेल दुर्गाच्या पाठीमागील खोलीत तुळजापूर येथे तिरट जुगाराचे साहित्यासह 05 मोबाईल फोन, 02 मोटरसायकल असा एकुण 1,12,650 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले.यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.13.02.2024 रोजी 12.00 ते 13.00 वा. सु. आनंदनगर पो. ठा. हद्दीत 3 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)आनंद बबनराव खळदकर, वय 49 वर्षे, रा. गणेश नगर धाराशिव ता.जि. धाराशिव हे 12.00 वा. सु. राधिका दुकानाचे बाजूला शेडमध्ये पोलीस लाईन समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 3,750 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर 2)संतोष सदाशिव पवार, वय 50 वर्षे, रा. आगडगल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव हे 12.20 वा. सु. शिपा पानटपरीचे पाठीमागे आनंदनगर धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,200 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 3)राहुल उर्फ रोमीत नानासाहेब गुळवे, रा. आनंदनगर ता. जि. धाराशिव हे 13.00 वा. सु. पशुवैद्यकीय दवाखान्या समोर आंनदनगर येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 3,650 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.13.02.2024 रोजी 11.10 वा. सु. उमरगा पो. ठा. हद्दीत शैकत बागवान यांचे पानटपरीचे पाठीमागे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)शिवशंकर दिगंबर कांबळे, वय 53 रा. कवठा, ता. उमरगा जि. धाराशिवहे 11.10 वा. सु. शौकत बागवान यांचे पानटपरीचे पाठीमागे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,920 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.