धाराशिव जिल्ह्यातील ३०० पेक्षा जास्त पत्रकाराचा १० लाखाचा अपघात विमा ३ मार्च रोजी काढण्यात येणार , ५ लाख रुपयाचे आयुष्यमान भारत कार्डचे होणार वाटप
धाराशिव : पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी जगभरामध्ये काम करणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांचा 3 मार्च रोजी 10 लाख रुपयांचा अपघात विमा काढण्यात येणारा आहे तसेच 5 लाख रुपयाचे आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच संघटनेच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील 300 पेक्षा जास्त पत्रकार या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. धाराशिव शहरात हा कार्यक्रम होणार आहे.
पत्रकारांच्या पाल्याचे शिक्षण, पत्रकारीता बरोबर जोड व्यवसाय, पत्रकाराचे घर , कटुंबाचे आरोग्य अशा विविध विषयांवर संघटना काम करत आहे. जिल्ह्यात देखील वाईस ऑफ मिडिया पत्रकारांच्या विविध विषयांवर काम करत आहे.