महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषणाला आज दि १३ फेब्रुवारी रोजी चौथा दिवस आहे. या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. व त्याप्रमाणे महाराष्ट्रात सगळीकडे सोशल मीडियावर मेसेज फॉरवर्ड होताना दिसत आहे.
धाराशिव जिल्ह्यात देखील मराठा समाजाच्या वतीने उद्या बंदची हाक पुकारण्यात आली आहे. व सोशल मीडियावर मेसेज फॉरवर्ड होताना दिसत आहे.
फारर्वड होत असलेल्या मेसेज खालील प्रमाणे..
उद्या दिनांक १४/०२/२०२४ रोजी मनोज दादा जरांगे पाटील अंतरवाली येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत तरी त्यांची तब्येत फारच खालावली आहे आणि शासन देखील दखल घेत नाही त्यासंदर्भात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे बंदला धाराशिवचा पाठिंबा म्हणून आपण धाराशिव शहर व जिल्हा बंदची हाक दिली आहे तरी धाराशिव शहरातील सर्व मराठा बांधवांनी सकाळी ठीक नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे उपस्थित रहावे ही विनंती
एक मराठा लाख मराठा
उद्या महाराष्ट्र बंद व धाराशिव बंद असल्याचे मेसेज फॉरवर्ड होत असल्याने नागरिक नागरिकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.