सहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना शासकीय कॅान्ट्रॅक्टर लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या ताब्यात

Spread the love

धाराशिव : तक्रारदार – पुरुष, वय 46 वर्षे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी – सिध्देश्वर मधुकर शिंदे, वय-३९ वर्षे, धंदा-नोकरी ( वित्त व लेखाधिकारी ) तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, तुळजापुर, जि. धाराशीव. ( वर्ग २) यांनी लाच मागणी
दि. 03/02/2024 रोजी केली व लाच दि. 07/02/2024 स्विकारली अशी माहिती धाराशिव लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दिली आहे.

या वेळी आरोपीने लाचेची मागणी रक्कम -10,00,000/-रु.( दहा लाख रुपये) ची मागणी करुन तडजोडीअंती 6,00,000/-रु (सहा लाख रुपये) स्विकारली आहे
      
थोडक्यात हकिकत अशी यातील तक्रारदार हे शासकीय कॅान्ट्रॅक्टर असुन तक्रारदार यांना श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापुर संचलीत श्री तुळजाभवानी सैनिक विदयालयाचे प्रशासकीय इमारतीचे पहिल्या मजल्याचे तसेच प्रवेशद्वार व संरक्षक भिंतीचे बांधकामाचे 03 करोड 88 लाखाचे कान्ट्रॅक्ट मिळाले होते. सदर बांधकामाचे 90% काम पुर्ण झाले आहे. सदर बांधकामाचे आत्तापर्यंत 02 करोड पेक्षा जास्त बिल तपासणी करुन मंजुरीसाठी पाठवून मिळवून दिले म्हणुन तसेच उर्वरीत बिल तपासणी करुन मंजुरीसाठी पाठविणेकरीता तसेच अतिरिक्त सुरक्षा रक्कम म्हणुन भरलेली 34,60,579/-रु ही परत मिळवून देण्यासाठी आलोसे याने पंचासमक्ष  10,00,000/- ( दहा लाख रुपये) ची मागणी करुन तडजोडीअंती 6,00,000/-रु ( सहा लाख रुपये) स्विकारण्याचे मान्य करुन आज रोजी पंचासमक्ष 6,00,000/-रु लाच रक्कम स्विकारताना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन तुळजापुर, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे अशी माहिती 7 जानेवारी रोजी दिली आहे.

या करवाईत सापळा अधिकारी – सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव मो. क्र. 9594658686,  मार्गदर्शक – मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर .मो.न. 9923023361 , मा. मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर ,  सापळा पथक – पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, आशीष पाटील होते.

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा कार्यालय 02472 222879 , टोल फ्री क्रमांक.1064


Spread the love

One thought on “सहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना शासकीय कॅान्ट्रॅक्टर लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या ताब्यात

  1. मला सांगा एवढी मोठी बातमी आपणं केलीत मग आरोप कोण व तक्रारदार कोण यांची नावे टाकण्यास काय अडचण आहे गुन्हा दाखल झाला असेल तर नावे टाकण्यास काय अडचण आहे.पत्रकार बंधु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!