पुणे, 8 फेब्रुवारी ,
आर्टिफिशियल इंटिलिजन्ससंदर्भात राज्य सरकार आणि गुगल यांनी एकत्र येत शेती, आरोग्य, शिक्षण, शाश्वतता आणि स्टार्टअप क्षेत्रात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार आज पुण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केले.
गुगलच्या मदतीने भूअभिलेख व्यवस्थापन, रोगनिदान, नागरी पर्यावरण विकास आणि या क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण आदी क्षेत्रात राज्य सरकार गुगलचे सहाय्य घेणार आहे. राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर आणि गुगलचे भारत देशासाठीचे प्रमुख संजय गुप्ता यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
उद्योजकता आणि संशोधन : गुगल स्टार्टअपला मेंटरशीप देणार, नेटवर्किंग तसेच गुगल तज्ञांच्या माध्यमातून, उद्योग जगताकडून प्रशिक्षण सेवा देणार
एआय प्रशिक्षण : राज्य सरकारच्या कौशल्य प्रशिक्षण केंद्रात गुगल प्रशिक्षण सुविधा निर्माण करणार. राज्य सरकारच्या 500 आयटी प्रोफेशनल्सला अत्याधुनिक शिक्षण-प्रशिक्षण देणार
आरोग्य : टीबी चेस्ट एक्सरे, मधुमेह इत्यादींसाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या सहाय्याने रूग्ण तपासणीसाठी तंत्रज्ञान पुरविणार
शेती : शेती, आकारमान, जलस्त्रोत, शेततळे याचे मॅपिंग, त्यामुळे डेटा आधारित निर्णयप्रक्रिया
शाश्वतता : प्रदुषणाचे रियलटाईम मॉनिटरिंग, नगरविकास, विद्युत व्यवस्था, नागरी परिवहन, कार्बन उत्सर्जन कमी करणे, मुंबईपासून सुरुवात.