परतापुर येथील 30 पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा

Spread the love

परतापुर येथील 30 पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा

धाराशिव : जिल्ह्यातील 30 पेक्षा जास्त नागरिकांना पुरण पोळी खाल्ल्याने विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
तीन दिवस अगोदर कळंब तालुक्यातील परतापुर गावात एका परिवाराकडून सवासनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याठिकाणी जेवून झाल्यावर तीन तासांनी त्रास झाला व नागरिकांनी खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतले. उपचार घेऊन. त्रास कमी होत नसल्याने नागरिकांनी शासकीय रुग्णालयात प्रथम उपचार घेतले व त्या ठिकाणाहून सर्वांना आज 8 फेब्रुवारी रोजी स्थानांतर करण्यात आले आहे.

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी 05:30 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत उपचारासाठी परतापुर येथील 30 नागरिकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 4 नागरिक अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. 30 पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा झाली असून यामध्ये काहींनी प्राथमिक उपचार घेतलें व त्यांना आराम मिळाला आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये महिलांची संख्या जास्त असून पुरुषांना देखील विषबाधा झाली होती मात्र त्यांनी प्राथमिक उपचार घेतल्याने त्यांना आराम मिळाल्याची माहिती रुगणाण सोबत आलेल्या नातेवाईकांनी माहिती दिली आहे.

या घटनेची माहिती मिळताच धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी त्या ठिकाणी भेट देऊन. रुग्णांची विचारपूस केली आहे तसेच योग्य उपचार करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. त्याचबरोबर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे व त्यांच्या पत्नी देखील या ठिकाणी उपस्थित राहून रुग्णांची विचारपूस करून रुग्णांना घाबरून न जाण्याचा दिलासा दिला आहे.

याबाबत सर्वांना विषबाधा कशामुळे झाली हे सर्वांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत अहवाल आल्यानंतर माहिती मिळेल अशी माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. अति दक्षता विभाग उपचार घेणाऱ्या 4 रुग्णांची देखील परिस्थिती स्थिर आहे. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे

गावातील नागरिकांनी  खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले त्या ठिकाणी चुकीचे उपचार झाले का? असा देखील प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात येत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!