धाराशिव : मुंबई शहरातुन घाटकोपर येथुन ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मौलाना मुफ्ती सलमान अझहरी यांच्यावर गजरात ए टी एस ने चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. व विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी याच्यामार्फत राष्ट्रपती यांना दि ६ फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले आहे.
मुफ्ती सलमान अझहरी यांच्यावर झालेली कारवाई कायद्याची चेष्टा करणारी आहे. गोष्टीवर आजारी यांना अटक करण्यात आली आहे. ती हेट स्पीच भारतीय दंड संविधान कलम 153 बी व 505 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्ट द्वारा दिलेल्या निदर्शनानुसार कारवाई करणे अपेक्षित होते मात्र त्यांना कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. गुजरात सरकार भारत देशातील अल्पसंख्यांक समाजावर दबाव आणण्यासाठी व कोणालातरी खुश करण्यासाठी कारवाई करत आहे. ही कारवाई देशाच्या भविष्यासाठी योग्य नाही. याचे भविष्यात देशावर गंभीर परिणाम होऊ शकतात. मौलाना अझहरी यांना तात्काळ सन्मान पुर्वक निर्दोष मुक्तता करावी. देशांमध्ये हेट स्पीच अनेक घटना सुरू आहेत. हिंदुत्ववादी संघटना व राजकीय पक्षातील नेते , कार्यकर्ते , लोप्रतिनिधी, खासदार, आमदार हे अल्पसंख्यांक समाजाच्या विरोधात भाष्य करत आहेत. त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
मौलाना अझहरी यांनी भाषण करताना कोणतेही तेढ निर्माण होईल किंवा देशाविरोधी कोणतीही भाष्य केलेले नाही , कोणत्याही समाजाबद्दल बोललेले नाहीत. तरीही देश विरोधात बोलल्याचे कारण दाखवत कारवाई करण्यात आली आहे. ही चुकीचे आहे. मौलाना अझहरी यांना सामजिक काम न करु देने व दाबाव आन्याचा प्रकार आहे. मौलाना अझहरी यांना तात्काळ सन्मान पुर्वक निर्दोष मुक्तता करावी. भारतातील मुस्लिम समाज व समाजाच्या धर्मगुरूवर द्वेष भावनेतून कारवाई होऊ नये. यामुळे देशाची अखंडता, शांतता संपुष्टात येईल. देशातील लोकशाही मुल्य घटनात्मक अधिकार यांचे पालण व्हावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर मौलाना जाफर अलीखान, कारी महंमद खान , मौलाना अफजल निजामी, हाफिज असलम, मौलाना ईरशाद बरकाती, हाफिज बिलाल रजा, हाफिज खुलखैरनैन, इमाम वसीम रजा, मसुद शेख, सय्यद खलील , अझर शेख, अझर मुजावर , शेख अलीम, मुजाहीद पठाण, शेख आयाज, खलीफा कुरेशी, बाबा मुजावर, शाहनवाज सय्यद, इस्माईल शेख, ईरशाद कुरेशी, आतीक शेख, मैनोद्दीन पठाण , शमी मशाक ,कलीम कुरेशी, इरफान शेख, मौलाना इम्रान , जमीर शेख, गफार शेख , मुस्तफा खान , मोहसीन शेख, अफोरोज पिरजादे, अँड अलीम शेख , यांच्या स्वाक्षऱ्या आहेत व मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.