धाराशिव : जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीत आरोपी नामे-1) सुवर्णा शंभुलिंग बोंगरगे रा. अणदुर ता. तुळजापूर, 2) शिवानंद मारुती रिंगणे रा. फुलवाडी ता. तुळजापूर, 3) मनोज सुखदेव कदम, 4) प्रविण शंकर मल्लाडे, 5) धानश्री मनोज कदम, रा. इनाम धामणी ता. मिरज जि. सांगली यांनी सन 2012 ते 2018 पावेतो नळदुर्ग येथे फिर्यादी नामे- शाहदाबी इक्करार अली सय्यद वय 68 वर्षे, रा. इंदीरानगर, नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी संगणमत करुन भुम प्रॉपकॉस लिमीटेड ही कंपनी स्थापन करुन शाहदाबी सय्यद व तिचे साथीदारांना सहा वर्षानंतर तुमच्या ठेवीवर 13 टक्के व्याजाने परतावा भेटेल असे सांगुन विश्वास संपादन करुन एकुण 35,90,000₹ ठेवीच्या स्वरुपात गुंतवून घेवून शाहदाबी सय्यद व त्यांचे साथीदारांनी नमुद आरोपींताना गुंतवलेल्या पैशाची व परतावा याची मागणी केली असता नमुद आरोपींनी थोड्या दिवसात 13 टक्क्याने परत करु असे सांगीतले. परंतु आज पावेतो गुंतवलेले पैसे व परतावा परत न करता शाहदाबी सय्यद व साथीदारांची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शाहदाबी सय्यद यांनी दि.05.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 420, 406 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.