धाराशिव : शहरातील आनंदनगर पोलीस ठाणे हद्दीतील आरोपी नामे- रोहन सतीश जाधव, रा. जुळे सोलापूर यांनी दि. 24.04.2023 ते दि. 21.06.2023 रोजी ज्ञानेश्वर मंदीर धाराशिव महाराष्ट्र बॅक शाखा मारवाडी गल्ली धाराशिव येथे फिर्यादी नामे- जर्नाधन भैरु काळे, वय 65 वर्षे, रा.तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे बाजूस तुळजापूर रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे कडून व त्यांची मुलगी नामे- अनुराधा जर्नाधन काळे हिचे कडून नमुद आरोपीने 5,16,000₹ घेवून ते दाम दुप्पट करुन देतो असे सांगून नमुद आरोपीचे खात्यावर पैसे नसताना सुध्दा फिर्यादीस 4,47,000 ₹ चा चेक दिला व मुलगी अनुराधा हिस 2,20,000₹ चा चेक देवून फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जर्नाधन काळे यांनी दि.04.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 420 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कळंब येथे 2 लाख 50 हजाराची फसवणूक..
कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) शंकर मारुती मस्के, 2) अर्चना शंकर मस्के दोघे रा.पारा ता. वाशी जि. धाराशिव, 3) पृथ्वी सत्ताप्पा कांबळे रा. लातुर यांनी दि.27.07.2023 रोजी 14.00 वा. सु. ते दि. 28.10.2023 रोजी 10.00 वा. सु. कळंब येथे फिर्यादी नामे- विठ्ठल रामभाउ जाधव, वय 51 वर्षे, व्यवसाय- उसतोड मुकादम, रा. एकता नगर, डिकसळ, ता. कळंब जि. धाराशिव यांचे कडून उसतोड मजुरीने काम करण्यासाठी वेगवेगळ्या तारखेला चेकद्वारे पैसे घेवून फिर्यादीचे उसतोड मजुर म्हणून काम न करता फिर्यादीकडुन चेक द्वारे 2,50,000 ₹ रक्कम घेवून फसवणूक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विठ्ठल जाधव यांनी दि.04.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 420, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.