धाराशिव तालुक्यातील साखर कारखान्यांची अचानक भेट देऊन वजन काटा तपासणी , तेरणा व डॉ बाबासाहेब आंबेडकर साखर कारखानाची वजनकाटे तपासणी
धाराशिव : तालुक्यातील 2 ठिकाणी साखर कारखान्यातील ऊस वजन काटा तपासणी भरारी पथकातील पथक प्रमुख व सदस्यांनी तालुक्यातील केशेगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना व ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे 1 फेब्रुवारी 2024 रोजी पथकाने अचानक भेट देऊन ऊस वजन काटा तपासणी केली आहे.
या पथकात धाराशिव नायब तहसीलदार मुगावे, सदस्य सचिव अ.म.पवार , तर ढोकी येथे पोलीस स्टेशन ढोकीचे श्रीमंत श्रिरसागर , साहयक निबंध सहकारी संस्था चे ए.एस कांबळे, विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 चे प्रतिनिधी बी.बी कानडे , शेतकरी रामेश्वर घोंगडे, निवृत्ती चव्हाण, प्रभाकर भिसे हे उपस्थित होते. व डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान येथे पथकातील अधिकारी व बेंबळी पोलीस ठाणे येथील एम.एल.गिरी व शेतकरी पाटील कैन्हया, विकास ढोले, ज्ञानेश्वर पाटील हे उपस्थित होते.