धाराशिव : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल शनिवार दि.03.02.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 19 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 550 लि. आंबवलेले रासयनिकद्रव्य हे नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आले. तर सुमारे 258 लि. गावठी दारु, 75 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव व देशी- विदेशी दारुच्या 100 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 1,05,590 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 19 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत. अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
1) धाराशिव शहर पोठाच्या पथकाने 5 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे–फुलचंद तुमराज देवकर, वय 24 वर्षे, रा. वडर गल्ली धाराशिव ता.जि.धाराशिव हे 18.30 वा. सु. आठवडी बाजारामध्ये नगर परिषद शाळा क्र 03 च्या पाठीमागे अंदाजे 1,600 किंमतीची 20 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे- नवनाथ तुमराज देवकर, रा. वडर गल्ली धाराशिव ता.जि.धाराशिव हे 19.45 वा. सु. आठवडी बाजार धाराशिव येथे अंदाजे 3,600 किंमतीची 35 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव जप्त करण्यात आले.
2) येरमाळा पो.ठा. च्या पथकाने 4 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-आकाश दत्तु पवार, वय 27 वर्षे, रा. वडगाव ज ता. कळंब जि. धाराशिव हे 13.30 वा. सु. चोराखळी शिवारातील शेत गट नं 351 मध्ये अंदाजे 28,000 किंमतीचे 350 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव जप्त करण्यात आले. तर आरोपी नामे-अजय धर्मा सरवदे, वय 42 वर्षे, रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव हे 13.10 वा. सु. तेरखेडा येथील होंडा शोरुमचे मागे मोकळ्या जागेत अंदाजे 840 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. तर आरोपी नामे-जिलानी लायखा पठाण, वय 43 वर्षे, रा. बाजार चौक येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे 18.00 वा. सु. येरमाळा बसस्थानक समोर येडेश्वरी इलेक्ट्रीकल च्या बाजूला अंदाजे 6,900 किंमतीचे 65 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-आशाबाई शाहु पवार, वय 44 वर्षे, रा. वाघोली ता. कळंब जि. धाराशिव हे 17.30 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या बाजूला वाघोली येथे अंदाजे 1,000 किंमतीची 10 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
3) तुळजापूर पो.ठा. च्या पथकाने 4 ठिकाणी छापे टाकले. आरेापी नामे-भैय्या अशोक परीट, वय 37 वर्षे, रा. सराया धर्मशाळेच्या पाठीमागे कमानवेस तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 14.20 वा. सु. सराया धर्मशाळेच्या पाठीमागे कमानवेस तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव येथे अंदाजे 1,050 ₹किंमतीची 15 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-शशिकांत कुमार तांबे, वय 33 वर्षे, रा. कुंभारी ता तुळजापूर जि. धाराशिव हे 17.20 वा. सु. कुंभारी येथे आपल्या राहात्या घरासमोरअंदाजे 2,400 किंमतीची 24 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-राज हरिश शेख, वय 32 वर्षे, रा. शुक्रवार पेठ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 17.15 वा. सु. तुळजापूर शहरातील जुन्या बस स्थानका समोरील शासकीय गोदामाजवळअंदाजे 2,000 किंमतीची 40 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-परमेश्वर अच्युत गायकवाड, वय 36 वर्षे, रा. हंगरागा ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 18.45 वा. सु. हंगरगा पाटी जवळअंदाजे 1,250 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
4) आंबी पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. आरोपी नामे- तर लक्ष्मण नामदेव खोसे, वय 43 वर्षे, रा.मलकापुर ता. परंडा जि. धाराशिव हे 19.00 वा. सु. हॉटेल जरांगे सरकार च्या पाठीमागे मोकळ्या जागेत रत्नापूर येथेअंदाजे 910 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
5)मुरुम पो.ठा. च्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे- रकमाजी गुलाब सोलंकर, वय 56 वर्षे, रा. अचलेर ता. लोहारा जि. धाराशिव हे 15.05 वा. सु. अचलेर ते आलुर जाणारे रोडचे उजवे बाजूस अंदाजे 2,400 ₹ किंमतीची 25 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-राजकुमार निलाप्पा कोळी, वय 30 वर्षे, रा महादेव नगर मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव हे 16.30 मुरुम येथील महादेव नगर मध्ये एका पत्र्याचे शेडसमोर अंदाजे 2,000 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-मालनबाई पोपट कांबळे, वय 67 वर्षे, रा. सुंदरवाडी ता. उमरगा जि. धाराशिव हे 18.30 देवी मंदीराजवळ सुदंरवाडी गावात अंदाजे 1,800 ₹ किंमतीची 18 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
6) लेाहारा पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. तर आरोपी नामे-गौतम तात्याराव भंडारे, वय 63 वर्षे, कास्ती बु ता. लोहारा जि. धाराशिव हे 18.30कास्ती बु आपल्या राहात्या घराचे पाठीमागे अंदाजे 1,680 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 21 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
7) नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. आरोपी नामे- युवराज नामदेव कांबळे रासलगरा दिवटी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 12.00 वा. सु. सलगरा दिवटी चौकात वडगाव रोड पाण्याची टाकीजवळ अंदाजे 30,840 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या सह मोटरसायकल क्र एमएच 25 एबी 1047 जप्त करण्यात आले.
8)आनंदनगर पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे- मंगलबाई संजय काळे, वय 40 वर्षे, रा. शिवछत्रपती नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे 16.45 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 2,560 ₹ किंमतीची 32 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-साईनाथ् बब्रु काळे, वय 30 वर्षे, रामनगर सांजा रोड धाराशिव ता. जि. धाराशिव हे 18.45 रामनगर सांजा रोड धाराशिव येथे अंदाजे 12,600 ₹ किंमतीची 30 लि. गावठी दारु व 200 लि. गावठी दरु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव जप्त करण्यात आले.
9) परंडा पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. आरोपी नामे- किरण अर्जुन सोनवणे, वय 29 वर्षे, रा. भिमनगर धोत्रा रोड परंडा ता. परंडा जि. धाराशिव हे 11.40 वा. सु. बसस्थानकच्या बाजूला परंडा येथे अंदाजे 2,160 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 27 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.