धाराशिव : जिल्ह्यामध्ये पाच ठिकाणी चोरी झाली असून यामध्ये धाराशिव शहरातील आनंदनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन ठिकाणी व वाशी, कळंब, तुळजापूर ठाणे हद्दीमध्ये देखील चोरी झाली आहे. व गुन्हा नोंद करण्यात आली असल्याची माहिती धाराशिव पोलीसांच्या वतीने देण्यात आली आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-शफीक युन्नुस शेख, वय 38 वर्षे, रा. खिरणीमळा धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि. 03.02.2024 रोजी 05.30 ते 05.40 वा. सु. तुळजापूर नळदुर्ग बायपास उड्डानपुलाचे सर्व्हीस रोडचे कच्या रस्त्यावर हंगरगा शिवार येथुन फोर्ड फेस्टा कार क्र16 एटी 2393 ने धाराशिव येथुन हैद्राबाद येथे अंत्यविधीसाठी जात होते. दरम्यान अज्ञात 4 इसमांनी फिर्यादीची कार आडवून कोयतृयाचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 77,000₹ माल जबरीने लुटून पसार झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शफीक शेख यांनी दि.03.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 341, 392, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- अभिषेक बाबुराव मारवाडकर, वय 36 वर्षे, रा. शाहु नगर तावडे प्लॉट धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.03.02.2024 रोजी 08.30 ते 12.30 वा. सु तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 24.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 35,000 असा एकुण 1,08,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अभिषेक मारवाडकर यांनी दि.03.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 454, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- निखील नितीन पवार, वय 23 वर्षे, रा. करंजकल्ला ता. कळंब जि. धाराशिव यांचे राहाते दुकानाचे शटर अज्ञात व्यक्तीने दि.02.02.2024 रोजी 19.00 ते दि. 03.02.2024 रोजी 07.00 वा. सु उचकटून आत प्रवेश करुन दुकानातील काउंटर मधील रोख रक्कम 80,000₹, तर निखली मथुरदास कांबळे यांचे राजमंगल बिल्डींग मटेरीयल ॲन्ड हार्डवेअर दुकानातुन रोख रक्कम 65,000₹, अनिल फुलचंद लोड यांचे टेडर्स यांचे दुकानातील 15,000₹ असा एकुण 1,60,000 ₹ किंमतीची रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- निखील पवार यांनी दि.03.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-ज्ञानेश्वर महादेव डोके, वय 23 वर्षे, रा. पारगाव ता. वाशी जि. धाराशिव यांची अंदाजे 2,00,000₹ किंमतीचा महिंद्रा मॅक्स पांढऱ्या रंगाचे पिकअप क्र एमएच 23- 4323 इंजीन नं –AB51B18635 चेसी नं – MA1ZA2ABA51B15172 हा दि. 29.01.2024 रोजी 01.00 ते 05.00 वा. सु. पारगाव येथील श्रध्दा इलेक्ट्रॉनिक समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ज्ञानेश्वर डोके यांनी दि.03.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-श्रीमंत दिगंबर जाधव, वय 65 वर्षे, रा. खामगाव ता. बार्शी जि. सोलापूर हे दि. 03.02.2024 रोजी 18.30 वा. सु. बसस्थानक धाराशिव येथुन धाराशिव ते बार्शी बसमध्ये चढत असताना त्यांचे गळ्यातील 20 ग्रॅम 340 मिली वजनाचे सोन्याचे लॉकेट अंदाजे 85,000₹ किंमतीचे हे अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- श्रीमंत जाधव यांनी दि.03.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.