धाराशिव : जिल्ह्यात चार ठिकाणी पोलिसांच्या वतीने जुगार विरोधी कारवाई करण्यात आली आहे यामध्ये धाराशिव शहरांमध्ये दोन ठिकाणी तर उमरगा व बेंबळी या ठिकाणी कारवाई करण्यात आल्याची माहिती धाराशिव पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे अधिक माहिती खालील प्रमाणे
उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.03.02.2024 रोजी 12.00 वा. सु. उमरगा पो. ठा. हद्दीत उस्मान हॉटेलचे समोरील मोकळ्या जागेत धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)अनिम चॉद पटेल, वय 45 वर्षे, रा. कोळनुर पांढरी ता. लोहारा, जि. धाराशिवहे 19.10 वा. सु. उस्मान हॉटेलचे समोरील मोकळ्या जागेत धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,150 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर 1)गणेश विश्वनाथ कांबळे, वय 28 वर्षे, रा. तुरोरी, ता. उमरगा जि. धाराशिवहे 17.45 वा. सु. अंबाबाई मंदीराच्या पाठीमागे तुरोरी येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,150 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले.यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
धाराशिव शहर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.03.02.2024 रोजी 20.30 वा. सु. धाराशिव शहर पो. ठा. हद्दीत विजय चौक धाराशिव जवळ आबा जाधव यांच्या गाळ्यासमोर कट्यावर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)मस्तान बाबु पठाण, वय 35 रा. दर्गा रोड वैराग नाका ता. जि. धाराशिवहे 20.30 वा. सु. विजय चौक धाराशिव जवळ आबा जाधव यांच्या गाळ्यासमोर कट्यावर मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 850 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलीसांनी दि.03.02.2024 रोजी 19.15 वा. सु. बेंबळी पो. ठा. हद्दीत चिखली चौरस्ता येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1) अनिल चंद्रकांत भोकरे, वय 43 रा. आझाद चौक बार्शी ह. मु. सारोळा ता. जि. धाराशिव हे 18.30 वा. सु. चिखली चौरस्ता येथे मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 3,870 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.03.02.2024 रोजी 12.00 वा. सु. आनंदनगर पो. ठा. हद्दीत उस्मान हॉटेल समोरील मोकळ्या जागेत धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1) पंडीत गुणवंत कांबळे, वय 35 रा. इंदीरानगर बस स्थानकचे बाजूला धाराशिव ता. जि. धाराशिव हे 12.00 वा. सु. उस्मान हॉटेल समोरील मोकळ्या जागेत धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,060 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.