धाराशिव, दि. 2 –
शहरातील भारत विद्यालयात सेवानिवृत्तीनिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षिका नंदिनी मस्तुद यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.
भारत विद्यालयातील शिक्षिका नंदिनी मस्तुद या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्याबद्दल 27 जानेवारी रोजी कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी स्वखर्चाने सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले.
कार्यक्रमास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, सिध्देश्वर कोळी, जयकुमार शितोळे, बाळासाहेब काकडे, सोमनाथ गुरव, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य पी. एन. चव्हाण, एन. बी. ताटे, शिक्षक सेनेचे सचिव चंद्रहार क्षीरसागर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशालेचे सहशिक्षक महेश क्षीरसागर यांनी केले. आभार मुख्याध्यापक जावळे यांनी व्यक्त केले.