धाराशिव जिल्ह्यात तीन ठिकाणी जुगार विरोधी कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती खालील प्रमाणे..
उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.02.02.2024 रोजी 17.30 वा. सु. उमरगा पो. ठा. हद्दीत कसगी येथील बसवेश्वर चौकातुन गावात येताना मोकळ्या जागेत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)रणधीर राजेंद्र आलगुडे, वय 32 रा. हनुमान नगर कसगी, ता. उमरगा जि. धाराशिवहे 17.30 वा. सु. कसगी येथील बसवेश्वर चौकातुन गावात येताना मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 10,270 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.02.02.2024 रोजी 18.20 वा. सु. वाशी पो. ठा. हद्दीत पारगाव बसस्थानक समोरील परिसरात छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)रामहारी पंडीत आखाडे, वय 29 रा. पारगाव ता. वाशी जि. धाराशिवहे 18.20 वा. सु. पारगाव बसस्थानक समोरील परिसरात कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 540 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.02.02.2024 रोजी 18.30 वा. सु. कळंब पो. ठा. हद्दीत विजय बेकरीच्या समोर चहाच्या टपरीवर रिकामे जागेत कळंब येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)पाशा दगडु शेख, वय 25 रा. चोंद गल्ली ता. कळंब जि. धाराशिव,2) दत्तात्रय रामदास गायकवाड, वय 23 रा. कळंब जि. धाराशिवहे 18.30 वा. सु. विजय बेकरीच्या समोर चहाच्या टपरीवर रिकामे जागेत कळंब येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,550 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.