धाराशिव : प्रतिनिधी
तालुक्यातील वाणेवाडी येथे प्रशांत घुटूकडे, इजि डॉ. ऋषिकेश डक व डॉ. सुरज घेवारे या गुणवंतांचा शुक्रवारी (दि.२) येथील कपालेश्वर मंदिरात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते वानेवाडी ग्रामस्थांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगळजवाडी सोसायटीचे चेअरमन बब्रुवान वाकुरे होतं. प्रारंभी गावकऱ्यांचा वतीने संजय पाटील दुधगावकर व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक गणपत चव्हाण यांनी सत्कारामागची भूमिका सांगितली. याप्रसंगी संजय पाटील यांनी डॉक्टर व इंजिनिअर यांनी वानेवाडी गावासाठी भविष्यातील अडीअडचणीसाठी परिवार व गावकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी गणपत चव्हाण, संजय उंबरे, प्रदीप घेवारे, पोलीस पाटील दिपक घेवारे, वैभव पाटील, रमेश केसकर, वैजनाथ घुटूकडे, माणिक घुटुकडे, उमाकांत धोंगडे, वैजनाथ घुटुकडे, राजेंद्र डक, गोपाळ चव्हाण, चित्र घेवारे, मुकुंद पाटील, शरणाप्पा केसकर, चांगदेव केसकर आदी उपस्थित होते.