धाराशिव जिल्ह्यातील दोघाचा बार्शी-जामगाव रोडवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार!, जिल्हात तीन अपघात!
धाराशिव : जिल्ह्यात अपघताचे प्रमाणात वाढत आहेत. आज पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार रस्ता अपघात तिघांचा मृत्यू झाला झाल्याची माहिती देण्यात आली आहे व झाले आहेत त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील दोघाचा बार्शी-जामगाव रोडवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार झाले आहेत. बार्शी-जामगाव रोडवरील सांस्कृतिक कला केंद्राजवळ भीषण अपघाताची घटना घडली. त्यामध्ये, शिवशाही बस आणि दुचाकीची दुपारी 1 वाजताच्या सुमारास धडक बसली आहे. MH25 AC 6937 या दुचाकीवरील 2 युवक ठार झाले. दत्ता सोमनाथ गुजर (30) आणि सलीम जब्बार शेख (29) दोघे राहणार रामेश्वर तालुका भूम जिल्हा धाराशिव, अशी मृतांची नावे आहेत. घटनास्थळी स्थानिक व पोलिसांनी धाव घेतली असून पंचनामा करण्यात येत आहे. अशी माहिती बार्शी टाइम्स या फेसबुक पेज वरुन प्रकाशित करण्यात आली आहे.
कळंब पोलीस ठाणे : आरोपी मयत नामे- विशाल नानासाहेब कोकाटे, वय 27 वर्षे, हे व सोबत श्रीराम मडके, विनायक लगड हे तिघे रा. मोहा, ता. कळंब जि. धाराशिव हे दि.24.01.2024 रोजी 19.00 वा. सु. मस्सा खं ते मोहा येथुन मोटरसायकल क्र एमएच 43 एएफ 5566 ही वरुन जात असताना मोहा मार्गावार कोकाटे वस्तीच्या पुढे आरोपी नामे- विशाल कोकाटे यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून रोडवरील खडीवरुन रोडचे खाली खड्ड्यात जावून पलटी होवून अपघात झाला. या अपघातात आरोपी नामे- विशाल कोकाटे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर श्रीराम मडके व विनायक लगड हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ओमकार रमेश मडके, वय 21 वर्षे, रा. मोहा, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.01.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304(अ) सह मोवाका कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण पोलीस ठाणे : मयत नामे-अशोक महादेव जगधने, व सोबत दिगंबर ज्ञानोबा समुद्रे दोघे रा. बोरगाव खुर्द, ता. कळंब जि. धाराशिव हे दोघे दि. 28.01.2024 रोजी 17.30 वा. सु. पिंपरी गावचे थोडे पुढे शिराढोण कडे जाणारे रस्त्यावरुन मोटरसायकल क्र एमएच 25 डब्ल्यु 1747 वरुन जात होते. दरम्यान बजाज पल्सर क्र एमएच 25 एझेड 8593 च्या चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चुकीच्या दिशेने चालवून अशोक जगधने यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात अशोक जगधने हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर दिगंबर समुद्रे हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी फिर्यादी नामे- मनिषा अशोक जगधने, वय 34 वर्षे, रा. बोरगाव खुर्द ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.01.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338 304(अ) सह मोवाका कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : आरोपी मयत नामे- शंकर धनंजय खंदारे, रा. बोरगाव ध. ता. कळंब जि. धाराशिव हे व सोबत फिर्यादी नामे- सुनिल ज्ञानोबा खंडागळे, वय 30 वर्षे, रा. शेलगाव दि. ता. कळंब जि. धाराशिव हे दोघे दि.29.11.2023 रोजी 10.30 वा. सु. येडशी ते ढोकी रोडवर शेलगाव ज. कडे जाणारे रस्त्यावरुन मोटरसायकल क्र एमएच 25 एए 9538 वरुन जात होते. दरम्यान आरोपी नामे शंकर खंदारे यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून कुत्रा आडवा आल्याने अचानक ब्रेक दाबल्याने अपघात झाला. या अपघातात आरोपी नामे- शंकर खंदारे हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाला. तर सुनिल खंडागळे हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुनिल खंडागळे यांनी दि.01.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 304(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.