धाराशिव –
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने रत्नागिरी येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुमार केसरी कुस्ती स्पर्धेचा आखाडा धाराशिवचा विजय विजय विनोद पवार याने गाजवून कांस्यपदक पटकावले. कुस्ती क्षेत्रात धाराशिव जिल्ह्याचा लौकिक वाढविल्याबद्दल त्याचा शिवसेनेचे धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आ.कैलास(दादा) घाडगे पाटील यांच्या हस्ते सोमवारी (दि.29) भव्य सत्कार करण्यात आला.
विजय पवार याने 48 वजनीगटात धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना अत्यंत चांगल्या कुस्त्या करीत कांस्यपदकाची कमाई केली. येडशी गावातील शिवनेरी तालमीचे वस्ताद आबा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने कुस्तीला सुरुवात केली. सध्या तो धाराशिव येथील हातलाई कुस्ती संकुलात सुधीर (अण्णा) पाटील, युवानेते अभिराम (भैया) पाटील, कोच सुंदर जवळगे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेत आहे. विजय याच्या रुपाने जिल्ह्याला पदक प्राप्त झाले. त्याच्या या यशाबद्दल धाराशिव येथे शिवसेनेच्या सुनील प्लाझामधील संपर्क कार्यालयात आ.कैलास (दादा) घाडगे पाटील यांच्या हस्ते भव्य सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच जिल्हास्तरीय सुधारक सन्मानकरिता चिलवडी येथील सौदागर बळीराम वाघ चिलवडी यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ माविम मित्र मंडळ पुरुष गटात चांगली कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याबद्दल सौदागर वाघ यांचाही आमदार कैलास(दादा) घाडगे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयकुमार (बापू) सस्ते, तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमानी, शहरप्रमुख सोमनाथ (आप्पा) गुरव, युवा सेना शहरप्रमुख रवि वाघमारे, उपतालुकाप्रमुख सौदागर जगताप, विभागप्रमुख मुकेश पाटील, अमोलअप्पा मुळे, विनोद पवार, गणप्रमुख बालाजी जाधव, संदीप गोफणे, सचिन देशमुख, धाराशिचे मा.नगरसेवक राणा बनसोडे, शिवसैनिक राकेश सूर्यवंशी, सुधीर जाधव, कृष्णा जाधव, सुरेश कापसे, आबासाहेब माळी, बाळासाहेब जाधव, अनंत हाजगुडे, बालाजी जाधव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते