धाराशिव (29.01.24) महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टुडन्ट इनोवेशन चॅलेंज चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे व त्यांचे नव उद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ देणे हे महाराष्ट्र स्टुडन्ट इनोवेशन चॅलेंज या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या चॅलेंजसाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील 47 विद्यार्थ्यांनी आपल्या नवसंकल्पना सादर करण्यासाठी सहभाग नोंदवला.त्यामध्ये महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन कडून आयोजित स्टार्टअप इनोवेशन राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्हा स्तरावर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील हर्ष बांगड ( प्रथम वर्ष – संगणक विभाग ) व उत्कर्ष म्हात्रे ( द्वितीय वर्ष – संगणक विभाग ) यांची जिल्हास्तरावर निवड झाली.
त्यांना 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापनदिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पोलीस मुख्यालयाच्या मैदानात संपन्न झाला.त्यावेळी त्यांना प्रमाणपत्र व प्रत्येकी रुपये एक लाख बीजभांडवल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. चालू वर्षामध्ये महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त नवसंकल्पना सादर करण्यासाठी स्वतंत्र्य कक्ष आहे .त्या माध्यमातून सतत प्रयत्न होत असल्यामुळे विद्यापीठ स्तरावर अविष्कार-२०२३ व राष्ट्रीय स्तरावर स्मार्ट इंडिया हेकाथॉन-२०२३ इथेही 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या नवसंकल्पना विद्यापीठ स्तरावर व राष्ट्रीय स्तरावर सादर केल्या आहेत.
महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमामध्ये विजेते व उपविजेते झाल्यामुळे हर्ष बांगड, उत्कर्ष म्हात्रे,प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने,इनोव्हेशन कोऑर्डिनेटर डॉ. सुशीलकुमार होळंबे, सर्व विभाग प्रमुख व या उपक्रमात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी गृहमंत्री मा.डॉ. पद्मसिंहजी पाटील साहेब , आमदार मा.राणाजगजितसिंहजी पाटील साहेब आणि संस्थेचे विश्वस्त मा.श्री. मल्हार पाटील व ट्रस्टचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनाचे उद्योगात रूपांतर होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व मदत केली जाईल असे प्रतिपादन करून विजेते व उपयोजितांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.