माहिती अधिकारी काझी पालकमंत्र्यांकडून सन्मानित
धाराशिव दि.२६ ):- जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी यासेरोद्दीन मखदुम काझी यांना आज 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्यातील जनतेच्या दैनंदिन जीवनात माहिती व जनसंपर्क विभागाचे अनन्य साधारण महत्व लक्षात घेता प्रभावी वार्तांकन व प्रशासन आणि माध्यमामधील सुसंवाद साधून उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल तसेच सेवेतून समाधान देऊन शासनाची प्रतिमा उंचावल्याबद्दल श्री.काझी यांना महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,निवासी उपजिल्हा अधिकारी डॉ.महेंद्रकुमार कांबळे आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
***