व्ही पी शैक्षणिक संकुलातील कृषी महाविद्यालयात व्यावसायिक तत्त्वावर भाजीपाला उत्पादनास सुरुवात

Spread the love

धाराशिव : प्रतिनिधी ,
व्ही पी शैक्षणिक संकुलातील कृषी महाविद्यालय आळणी येथील उद्यान विद्या विभागाअंतर्गत व्यावसायिक तत्त्वावर भाजीपाला उत्पादनास सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांच्यात उद्योजकता कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने महाविद्यालयात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सदर उपक्रम पदवीच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी राबवत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांनी कारले, रेड केबेज, ब्रोकोली, चेरी टोमॅटो, लेट्यूस इ.यामध्ये विद्यार्थी स्वतः भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन त्याची विक्री करणार आहेत.भाजीपाल्यांमध्ये प्रमुख आकर्षण म्हणजे परदेशी भाजीपाला ब्रोकोली व नव्याने विकसित केलेले कोबीचे वाण रेड कॅबेज तसेच चेरी टोमॅटो हे प्रमुख आकर्षण बनले आहे.

सदर प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यासाठी उद्यान विद्या विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका एस. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम सत्राचे विद्यार्थी सौरभ मस्के,रोहन हिरेमठ,ऋषिकेश कोकाटे, प्रथमेश लाळगे, सागर माळी, विश्वजित पाटील, वैभव मुळे, आदित्य मोरे, मनोज ओडेकर, कुमारी वेंकटेश्वर, किशोर नाईक,निखिल नाईक,प्रतीक पाटोळे,अचुत गिरी, सुप्रिया चव्हाण,ऋतुजा भोसले, साक्षी पाटील, वैष्णवी औताडे.या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले. सदर उपक्रमाद्वारे युवकांना रोजगार निर्मिती होणार असल्याने उस्मानाबाद शहर व परिसरातील युवक व युवतीने प्रकल्पास भेट देऊन तांत्रिक प्रशिक्षण घेऊन अल्प खर्चात भाजीपाला उत्पादन व्यवसाय सुरू करावा असे आवाहन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांती कुमार पाटील यांनी केले.तसेच वेळोवेळी महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे यांचे विद्यार्थ्यांना सहकार्य लाभले.उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कृषी शिक्षण विस्तार विभागाचे प्रा डॉ. गांधीले ए. ए. व प्रा शेटे डी. एस. , मृदा शास्त्र विभागाचे प्रा. सुतार एन. एस , वनस्पती शास्त्र विभागाच्या प्रा. खरपुडे पि. सी. व प्रा.माळी पि. पि., कृषी अर्थशास्त्र विभागाचे प्रा. भालेकर एस. व्ही.यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी उपक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!