मुंबई येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरव मतदार नोंदणी उत्कृष्ठ कार्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे सन्मानीत

Spread the love

  धाराशिव,दि.25 ):-  जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी  यांना उत्‍कृष्‍ट जिल्‍हाधिकारी  व जिल्‍हा निवडणूक अधिकारी  तसेच भटक्‍या व विमुक्‍त समाजातील व्‍यक्‍तींसाठी उत्‍कृष्‍ट कामगिरी करणारे जिल्‍हाधिकारी व जिल्‍हा निवडणूक अधिकारी या दोन संदर्भात सत्‍कारासाठी निवड करण्‍यात आली. सत्काराचा कार्यक्रम 24 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथे पार पडला. श्रीकांत देशपांडे, मुख्‍य निवडणूक अधिकारी  ,  महाराष्‍ट्र राज्‍य मंत्रालय मुंबई यांचे हस्‍ते  डॉ.सचिन ओम्‍बासे, जिल्‍हाधिकारी तथा  जिल्‍हा निवडणूक अधिकारी यांचा प्रशस्‍तीपत्र देवून गौरव करण्‍यात आला. आहे.  शिरिष यादव यांची उत्‍कृष्‍ठ उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी पुरस्‍कार 2024  साठी निवड करण्‍यात आली.   तसेच उत्‍कृष्‍ठ मतदार नोंदणी अधिकारी  पुरस्‍कार 2024  साठी संजय पाटील, मतदार नोंदणी अधिकारी 242- उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघ तथा  उपविभागीय अधिकारी  कळंब  व  भटक्‍या  व  विमुक्‍त समाजातील व्‍यक्‍तींसाठी उत्‍कृष्‍ठ कामगिरी करणारी संस्‍था म्‍हणून श्री मारुती बनसोडे, परिवर्तन सामाजिक संस्‍था,नळदूर्ग ता.तुळजापूर जि. धाराशिव यांचा  मुख्‍य निवडणूक अधिकारी  ,  महाराष्‍ट्र राज्‍य मंत्रालय मुंबई यांचे हस्‍ते गौरव करण्‍यात आला.

       01 जानेवारी 2024  या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नव मतदार नोंदणी , महिलांची अधिक मतदार नोंदणी, विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती मधील मतदारांची नोंदणी, तृतीयपंथी नागरिकांची नोंदणी तसेच दिव्‍यांग मतदारांची नोंदणी करण्‍यात आलेली आहे. दि.23 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या अंतीम मतदार यादीत एकूण  13 लाख 66 हजार 722  मतदार आहेत.  सदर विशेष संक्षि‍प्‍त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नव मतदार नोंदणी एकूण नमुना 6 चे  एकूण  87 हजार 081 अर्ज  प्राप्‍त झाले आहेत. त्‍यामध्‍ये स्‍त्री मतदार  43 हजार 867, पुरुष मतदार 43 हजार 201  व इतर 13 मतदार आहेत.  मयत , दुबार , स्‍थलांतरीतचे एकूण 62 हजार 947 नमुना 7 चे अर्ज प्राप्‍त झाले आहेत. त्‍यामध्‍ये स्‍त्री मतदार  29 हजार 780, पुरुष मतदार 33 हजार 164 व इतर 3 मतदार आहेत. तसेच नाव व पत्‍ता दुरुस्‍तीचे नमुना 8 चे एकूण  27 हजार 104 अर्ज प्राप्‍त झाले आहेत. त्‍यामध्‍ये स्‍त्री मतदार 10 हजार 230, पुरुष मतदार 16 हजार 863 व इतर 11 मतदार आहेत आहेत.

          भटक्‍या व विमुक्‍त समाजातील व्‍यक्‍तींसाठी धाराशिव जिल्‍हयात  एकूण 61 शिबिरे घेण्‍यात आली. या शिबिराअंतर्गत 6 हजार 968 लाभार्थींना विविध सेवा पुरविण्‍यात आल्‍या.  यामध्‍ये नव  मतदार नोंदणी 1 हजार 295, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्‍ती 903, शिधा पत्रि‍का वितरण  2 हजार 19,जात प्रमाणपत्र वितरण  2 हजार 476  व सामाजिक योजनांचा 275 लाभार्थींना लाभ देण्यात आला. 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!