धाराशिव : प्रतिनिधी
आमदार रोहित पवार व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना ईडीने नोटीस बजावली असून सरकारच्या विरोधात काम करणाऱ्या व्यक्तींची ही गळचेपी आहे असा घणाघाती हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केला आहे.
भाजप सरकार जे लोक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरतात किंवा सरकारच्या विरोधात आवाज उठवतात त्यांच्या विरोधात कटकारस्थान करून ईडी या संस्थेचा गैरवापर केला जातो आणि सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या व्यक्तीला नामोहरण करण्याचा प्रयत्न केला जातो असाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी महापौर तथा नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या बाबतीत देखील होत आहे याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. अशी प्रतिक्रिया प्रसिद्धी पत्रकाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी दिली आहे.
- वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज भ्रष्टाचार…, ईटीएस मोजणी अहवाल २ महिन्यात सादर करा.. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश..
Spread the love नागपूर , दि. ११ डिसेंबर वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज ईटीएस मोजणी अहवाल २ महिन्यात सादर करा असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत.वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आल्या आहेत.यामुळे सरकारचा ६०० कोटींचा महसूल बुडाल्याची तक्रार अमोल कोमावार यांनी केली आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील… - वर्षात फक्त स्थगिती दिसली प्रगती नाही! तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार
Spread the love धाराशिव ता. 5: महायुतीचे सरकार येऊन वर्ष झाले पण भाजपच्या नेत्यांनी प्रगती पेक्षा स्थगितीसाठी शक्ती पणाला लावल्याने जिल्ह्यात स्थगिती दिसली पण प्रगती काय दिसेना असा थेट पलटवार शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी भाजपवर केला आहे.यावेळी जाधवर म्हणाले की, दरवर्षी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आता पूर्ण असं सांगितले जाते वस्तूस्थितीपासून… - जिल्ह्यातील सर्वच मतदारांचे मनःपूर्वक आभार भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी
Spread the love धाराशिव- नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील मतदारांनी दाखवलेल्या शांत, संयमी आणि उत्साही प्रतिसादाबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी जिल्हावासियांचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे आभार मानले आहेत. नागरिकांनी जबाबदारीची जाण ठेवत मतदानात सहभाग नोंदवला असून प्रत्येक मत हे स्थानिक विकासासाठी निर्णायक ठरणारे आहे. हा उत्स्फूर्त सहभाग लोकशाहीवरील दृढ विश्वास अधोरेखित करणारा आहे. याबरोबरच निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि… - आश्रमशाळा शिंगोलीत संविधान दिनानिमित्त विद्यार्थी शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन व पालक मेळाव्याचे आयोजन
Spread the loveधाराशिव : दिनांक: २६ नोव्हेंबर २०२५ वार बुधवार रोजी विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा व आदर्श प्राथमिक आश्रमशाळा शिंगोली ता. जि. धाराशिव शाळेच्या संयुक्त विद्यमाने “संविधान दिन” साजरा करण्यात आला.संविधान दिनानिमित्त शाळेत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.सर्व प्रथम पालक व माता पालक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात… - सामाजिक वनीकरण विभागात हजेरी नोंदवहीत अनियमितता? भविष्यातील तारखांच्या सह्या आढळल्याने प्रश्नचिन्ह
Spread the loveधाराशिव येथील सामाजिक वनीकरण विभागात हजेरी नोंदवहीत गंभीर अनियमितता आढळल्याची माहिती मिळत आहे. विभागाच्या कार्यालयात दोन दिवसांपूर्वीच आगामी दिवसांच्या उपस्थितीच्या सह्या नोंदवलेल्या असल्याचे प्रत्यक्ष पाहण्यात आले. उपस्थिती नोंद हे शासकीय कामकाजातील महत्त्वाचे दस्तऐवज मानले जातात. अशा नोंदी भविष्यात आधीच भरल्या जाणे हे नियमबाह्य असून त्यावर शंका निर्माण करणारे आहे. एका कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत हजेरी…




