धाराशिव : आयोध्या येथे प्रभुरामचंद्र मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त धाराशिव शहरातील समर्थनगर येथील श्रीराम मंदिरामध्ये सोमवारी (दि.२२) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्यासाठी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
धाराशिव शहरातील समर्थनगर येथील श्रीराम मंदिरात सोमवारी (दि.२२) पहाटे काकडा आरती करण्यात आली. यानंतर श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्या मुर्तीस महाभिषेक करण्यात आला. तसेच आयोध्या येथे प्रभुरामचंद्राची मुर्ती प्रतिष्ठापत झाल्यानंतर येथील मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, आमदार कैलास पाटील यांचे वडील बाळासाहेब पाटील, रुपामाता उद्योग समुहाचे सर्वसर्वा अॅड. व्यंकट गुंड, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,मंडळाचे अध्यक्ष श्रीपात देशपांडे, उपाध्यक्ष योगेश जाधव आदींच्या हस्ते महाआरती करण्यात आली. दरम्यान, आयोध्या येथील श्रीराम मुर्तीचे थेटप्रेक्षपण मोठ्यापडद्यावर दिवसभर दाखवण्याता आले. यानंतर भाविकांना मोतीचुर लाडू, जिलेबीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. दुपारी येथील महिला मंडळाच्या वतीन भाजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी धाराशिव शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.