श्री तुळजाभवानी कृषि महोत्सव 2024 मध्ये जिल्ह्यातील कृषी क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचा सपत्नीक व कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार समारंभ संपन्न

Spread the love


धाराशिव : शहरामध्ये मागील तीन दिवसांपासून श्री तुळजाभवानी कृषि महोत्सव 2024 सुरू असून आज चौथ्या दिवशी जिल्ह्यातील कृषी क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या शेतकऱ्याचा जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र माने,श्रीमती वर्षा मरवाळीकर समन्वयक कृषि विज्ञान केंद्र तुळजापूर, बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थपाक व कृषि विभागाचे अधिकारी यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील पुढील शेतकऱ्यांचा समावेश होता.


धाराशिव तालुका आबाजी शिवाजी यादव लासोना, अजिंक्य राजेंद्र मगर वाघोली, महेश सोमनाथ जमाले कसबे तडवळा, अनिता बाबासाहेब चव्हाण करजखेडा,अण्णा काका रणदिवे मेडशिंगा तुळजापूर तालुका शिवमूर्ती शिवाजी साठे काक्रंबा, महादेव दत्तू सोनटक्के इटकल, सुदर्शन शिवाजी जाधव गंजेवाडी, विशाल रमेश वडणे माळुंब्रा, अजय कुमार पवार शहापूर तालुका लोहारा नागेश देविदास शिंदे जेवळी, संपर्क करून मल्लिनाथ शरनापा चिंचणसुरे आष्टा कासार, सोमनाथ अशोक भोंडवे हिप्परगा सय्यद, राजकुमार रामराव पाटील आरणी, महेश बळवंत पाटील मुर्षदपुर

उमरगा तालुका
ज्ञानेश्वर दत्तू दस मे काळनिंबला, संजय बाबुराव पाटील कंटेकुर, शाहूराज बाबुराव पाटील मळगी, नागनाथ आप्पाराव हिंडले सुपतगाव, बाबासाहेब खंडागळे मुरूम

कलंब तालुका
बाळासाहेब बापूराव पाटील माळकरंजा, सुरज शिंदे सात्रा, हनुमंत फुलचंद मुंडे वडगाव ज, उमाकांत चंद्रसेन गिराम रायगव्हाण, हरिदास बळीराम माळी जवळा खु, लक्ष्मण अरुण अडसूळ ईटकुर, बापूराव गजेंद्र नहाने देव धानोरा, श्रीकांत गोविंदराव भिसे एकुर्गा


तालुका वाशी
कृष्णा बिभीषण हाके सरमकुंडी, भाऊसाहेब भागवत जोगदंड जोगदंड पिंपळगाव क, दत्तात्रय महादेव कागदे वाशी, गीता संभाजी भांडवले वाशी, विश्वास उंद्रे वाशी


भूम तालुका
लिंबराज महादेव गोरे अंतरगाव, दयानंद मोठे पाटील अंजन सोडा, भर तरी त्र्यंबक टाळके राळेसांगवी, दादा बबन गाढवे, बेदरवाडी, डॉक्टर भरत केरबा दळवे पाटसांगवी


परंडा तालुका
उत्कर्ष आप्पासाहेब देशमुख डोंजा, अंकुश उत्तम होरे खासगाव, साधना संभाजी बानगुडे वाकडी, अंकुश जगन्नाथ नाळे खानापूर, किरण दादासाहेब गवारे जवळा नि.
कार्यक्रमाच्या सुरवातीस कृषि विज्ञान केंद्र तुळजापूर येथील कार्यक्रम समन्वयक श्रीमती वर्षा मरवाळीकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषि क्षेत्रामध्ये महिलांचा वाढता सहभाग व कृषि विज्ञान केंद्र यांचेमार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम याबद्दल माहिती दिली.तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ समन्वयक श्रीमती शोभा कुलकर्णी यांनी महिलांकरीता महिला आर्थिक विकास महामंडलाकडून राबविण्यात येत असलेल्या योजना, लोकसंचलीत केंद्रामार्फत होणारे कार्य,बचत गटांना व्यवसाय करणेसाठी कर्ज याबद्दल माहिती देवून आजपर्यंत 26 कोटी कर्ज दिल्याचे सांगितले.राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांमार्फत मोठया प्रमाणात कर्जची उपलब्धता बचत गटांना होत असल्याचे सांगून सद्या कृषि महोत्सवामध्ये 25 स्टॉल असून यामध्येखाद्यपदार्थ, वस्तू समावेश असून 5 ते 7 हजार उत्पन झालेले आहे. महिला आर्थिक विकास महामंडलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

शेतकरी पद्माकर नाळे परंडा यांनी त्यांचे शेती क्षेत्रातील अनुभव सांगत विषमुक्त शेती, पिकांचे अधिक उत्पादन घ्यावयाचे तंत्रज्ञान याबद्दल मार्गदर्शन केले.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी शेतकरी सन्माना बद्दल माहिती देऊन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कृषि महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करून दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यातील कलंब येथील बापू नाहणे व श्रीकांत भिसे यांचा सन्मान दिल्ली येथे हॊणार असलेची माहिती देत कृषि महोत्सवातील स्टॉल धारक यांना आजपर्यंत अंदाजे 44 लाखाचे उत्पन्न मिळाले असल्याचे सांगून आज संपन्न झालेल्या खरेदीदार विक्रेता संमेलनातून होणार फायदा व स्मार्ट योजनेतुन सोयाबीन साठवणूकीसाठी उपलब्ध होत असलेली सुविधा याबद्दल माहीती दिली.
जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी कृषि महोत्सवातील स्टॉल,शेतकऱ्यांची नावियपूर्ण उत्पादने, यंत्र यांचा शेतकरी यांना लाभ होत असून शेतकरी यांचे साठी पोलीस विभागाकडून शेतकरी ते ग्राहक भाजीपाला विक्री स्टॉल,शेतकरी यांचे शेती संबंधित प्रश्न /तक्रारी सोडविण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर समिती करून मार्गी लावण्यात येत असल्याचे सांगत गाव निहाय शेतकरी व्हाट्सअप्प ग्रुप व youtube च्या माध्यमातून प्रगतशील शेतकरी यांची यशोगाथा व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे सुरू असल्याचे माहिती दिली.जिल्ह्यातील शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेती करून ऑरगॅनिक पासपोर्ट ची माहिती देऊन लाभ घेणेसाठी आवाहन केले.तसेच ऑरगॅनिक amzone ही संकल्पना जिल्ह्यात 26 जानेवारी पासून सुरू होत असल्याचे सांगुण कृषि विभागाचे अभिनंदन करत शेतकऱ्याचे आभार मानले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!