- अयोध्या कारसेवेला गेल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला पुरावा, उबाठा नेत्यांची बोलती केली बंद!
- नागपुरातून अयोध्येतील कारसेवेला जात असतानाचे रेल्वे स्थानकावरील छायाचित्र केले ट्विट
- नागपुरातील ‘नवभारत’ या वृत्तपत्रात त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर रेल्वेस्थानकावरचे छायाचित्र झाले होते प्रकाशित असे फडणवीस यांनी ट्विट केले आहे
- नवभारतचे आभार मानत देवेंद्र फडणवीस यांनी केले ते छायाचित्र ट्विट
- त्याकाळी मोबाईल नव्हते, त्यामुळे छायाचित्र उपलब्ध नाहीत, त्यामुळे राजकीय पक्षांना पुरावे मागणे सोपे झाले होते.
- पण, देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्रात प्रकाशित हे छायाचित्र जारी करुन पुरावे मागणार्या उद्धव ठाकरे, संजय राऊतांची बोलती बंद केल्याचे बोलले जात आहे.
DCM Devendra Fadnavis tweets
जुनी आठवण…
नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र.
छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे…
नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे.