New Delhi : मॉस्कोला जाणारे भारतीय विमान ( Indian Airlines ) अफगाणिस्तानमध्ये कोसळले. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात हा अपघात झाला. हे विमान अफगाणिस्तानमार्गे रशियाला जात होता. भारतीय विमान ( Indian Airlines ) काल रात्री रडारवरून गायब झाले होते. अफगाणिस्तानमधील पर्वतारांगेत हा अपघात झाला जिबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात भारतीय विमान ( Indian Airlines ) कोसळल्याची प्राथमिक माहिती.
कुरण-मुंजन आणि झिबाक जिल्ह्यात हे भारतीय विमान कोसळल्याचा दावा केला जात आहे. या विमानात किती प्रवाशी होते? त्यापैकी किती सुरक्षित आहेत किंवा किती ठार झाले आहेत याची माहिती अद्याप कळू शकलेले नाही. याबाबत माहिती संकलित करण्यात येत आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय विमान ( Indian Airlines ) अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येते आहे.