धाराशिव : अवैध मद्य विरोधी धाराशिव जिल्ह्यात भुम, आंबी, येरमाळा पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
भुम पोठाच्या पथकास आरोपी नामे –1)हलु कल्याण पवार, वय 38 वर्षे, रा. इंदीरानगर भुम ता. भुम जि. धाराशिव या दि.20.01.2024 रोजी 15.30 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या समोर अंदाजे 2,000 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
आंबी पोठाच्या पथकास आरोपी नामे –1)दादा बाबुराव जठार, रा. नळीवडगाव, ता. भुम जि. धाराशिव हेदि.20.01.2024 रोजी 17.15 वा. सु. हॉटेल शिवतेजच्या पाठीमागे अंदाजे 840 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये आंबी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
येरमाळा पोठाच्या पथकास आरोपी नामे –1)योगेश भारत बारकुल, वय 27 वर्षे, रा. येरमाळा, ता. कळंब जि. धाराशिव हे दि.20.01.2024 रोजी 17.30 वा. सु. अनुष्का हॉटेलच्या बाजूस येरमाळा येथे अंदाजे 6,710 ₹ किंमतीची देशी विदेशी दारूच्या 13 सिलबंद बाटल्या व 55 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.