धाराशिव : येथील श्री तुळजाभवानी कृषि महोत्सव २०२४ – दिनांक २१/०१/२०२४ रोजी जिल्हयातील शेतकऱ्यांचा सन्मान समारंभ होणार
धाराशिव जिल्हयाचा श्री तुळभावानी जिल्हा कृषि महोत्सव दिनांक १८ ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत मा. पोलिस अधिक्षक, पोलिस मुख्यालय, धाराशिव येथील नवीन कार्यालयाचे बांधकाम चालु असलेल्या इमारती मागील मैदान येथे सुरु आहे.
सदर कृषि महोत्सवात कृषि प्रदर्शकन, कृषि विषयक चर्चासत्रे इत्यादीव्दारे शेतकऱ्यांना सुधारीत कृषि तंत्रज्ञान व विविध शासकीय योजना यांची माहिती उपलबध करुन देण्यात येणार आहे. शासनाचे विविध विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषि विज्ञान केंद्र, कृषि महाविद्यालय, विविध महामंडळे इ. स्टॉल यात समाविष्ट आहेत.
कृषि महोत्सवाचे उद्घाटन मा. पालकमंत्री महोदय यांनी दिनांक १८/०१/२०२४ रोजी दुरदृश्य प्रणालीवरुन (ऑनालाईन) केले आहे. कृषि महोत्सवामध्ये पाच दिवस विविध परीसंवाद, चर्चासत्रे व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असून दिनांक २२/१/२०२४ रोजी जिल्हयातील कृषि क्षेत्रामध्ये नाविण्यपुर्ण शेती व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान समारंभ आयोजित केलेला होता.
परंतु सदरील शेतकरी सन्मान समारंभ दिनांक २१/०१/२०२४ रोजी दुपारी २ वाजता आयोजित केला असून जिल्हयातील शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात पोलीस अधिक्षक मैदान, धाराशिव येथे संपन्न होत असलेल्या श्री तुळभावानी जिल्हा कृषि महोत्सवास भेट द्यावी व शेतकरी सन्मान समारंभाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. रविंद्र माने यांच्या वतीने करण्यात येत आहे.