धाराशिव : परंडा पोलीस ठाणे: आरेापी नामे-1)बालाजी माधवराज पारसे रा. बोंन्ती ता. औराद जि. बिदर राज्य कर्नाटक ह.मु. मधुकर सुखदेव चौबे यांचे कांदलगांव शिवार शेत गट नं. 110 मधील पालावर ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.19.01.2024 रोजी 04.00 वा. सु. मधुकर सुखदेव चौबे यांचे कांदलगाव शिवार शेत गट नं. 110 मधील विहीरीत मयत नामे- मिनाबाई बालाजी पारसे रा. बोंन्ती ता. औराद जि. बिदर राज्य कर्नाटक ह.मु. मधुकर सुखदेव चौबे यांचे कांदलगांव शिवार शेत गट नं. 110 मधील पालावर ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी दारु पिवून लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली व तुला आता जिवेच मारतो असे म्हणून मयत मिनाबाई पारसे हिस पोहता येत नसल्याचे नमुद आरोपीस माहित असतानाही तिला जाणून बुजून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने विहीरीत ढकलुन देवून तिला जिवे ठार मारले.
आशा मजकुराच्या मयताची बहिण फिर्यादी नामे- गोंडराज ज्ञानोबा टाळीकुटे, वय 25 वर्षे, रा. खेरडा, बु ता. औराद जि. बिदर राज्य कर्नाटक, ह.मु. मधुकर सुखदेव चौबे यांचे कांदलगांव शिवार शेत गट नं. 110 मधील पालावर ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.19.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 302, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. अशी माहिती प्रेस नोट द्रवारे पोलीस अधीक्षक कार्यालय मार्फत देण्यात आली आहे