धाराशिव दि.१५( प्रतिनिधी): धाराशिव तालुक्यातील आंबेहोळ या गावामध्ये रविवार दिनांक १४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शूरवीर संभाजी करवर यांची 389 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,
शूरवीर संभाजी करवर यांच्या प्रतिमेचे पूजन हटकर समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष करवर, भवानी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष लिंबराज डुकरे, ऋषिकेश यमगर, भैया करवर यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी सुखदेव लोंढे, रमेश गायकवाड, सरपंच मयूर लोंढे, इमाम शेख, विलास आव्हाड, मुनीर शेख, निरंजन सोनवणे, बबलू शेख, दिलीप पाटील, अलाउद्दीन शेख, अविनाश करवर, अमोल करवर, योगेश भुसनर, गणेश सदगर, विलास लोंढे, शाहीर लोंढे, लाला शेख, कोंडीबा करवर, संजय करवर, अजित करवर, दीपक करवर, पार्थ बेलदार, पांडुरंग करवर, विजय करवर, सिद्धेश्वर करवर, सुरज पाटील, यांच्यासह आंबेहोळ गावातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.