संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी भव्य सभेेस करणार मार्गदर्शन
धाराशिव-
शेतकर्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी धाराशिव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवार, 15 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चानंतर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.खा. राजू शेट्टी, उच्चाधिकार समितीचे प्रा.डॉ.प्रकाश पोफळे शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. या मोर्चात शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे पाटील, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले, परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, कार्याध्यक्ष रवीकिरण गरड, राज्य कार्यकारिणी सदस्य बिभीषण भैरट, जिल्ळा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, स्वाभिमानी युवा आघाडीचे अध्यक्ष विष्णू काळे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजाभाऊ हाके, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, संपर्कप्रमुख ईश्वर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे, कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ उठवावी, दुध दरवाढीवर तात्काळ शेतकर्यांना भाव दिला पाहिजे. शेतीमाल उत्पादनाच्या आधारित दीडपट हमीभाव द्यावा, शेतकर्यांना वन्य प्राण्यांच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी सरकारने 100 टक्के कुंपण योजना अनुदानित करावी या प्रमुख मागण्यांसाठी हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येत आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. या मोर्चासाठी स्वाभिमानी पक्षाचे तालूकाध्यक्ष नेताजी जमदाडे, तालुकाध्यक्ष गुरूदास भोजने, बाळासाहेब मडके, चंद्रकांत समुद्रे, तात्या रांजणीकर, पंकज पाटील, विकास मार्डे, प्रदीप जगदाळे, अमृत भोरे, दाजी पाटील, प्रदीप गाटे, चंद्रकांत नरुळे, नरसिंग पाटील, डॉ.अनिल धनके, अभय साळुंके, संजय भोसले, सुरेश नेपते, चंद्रकांत साळुंके, कल्याण भोसले, विजय सिरसट, बापूसाहेब थिटे, सुनील गरड, अॅड.वसंतराव जगताप, गजानन भारती, संतोष भैरट, शुभम पवार, रामेश्वर कारभारी, हुसेन शेख, शंकर घोगरे, रामेश्वर नेटके, शिवाजी ठवरे, श्री.मजगे आदी पदाधिाऱ्यांनी गावागावात जाऊन मोर्चा बाबत जनजागृती केली होती.