धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी पोलिसांनी जुगार विरुद्ध कारवाई केली आहे. मध्ये धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे पाच जनाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे तर मुरूम पोलिसांनी एकावर गुन्हा नोंद केला आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव ग्रामीण पोलीसांनी दि.09.01.2024 रोजी 20.00 वा. सु. धाराशिव ग्रामीण पो. ठा. हद्दीत सिकंदर बागवान यांचे विटभट्टी लगत दत्ता येलकर यांचे घरासमोर पत्रयाचे मोकळ्या जागेत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)प्रशांत बबन जगताप, वय 30 वर्षे,2) सुनिल भगवान वाघमारे, वय 38 वर्षे, 3) सचिन हरिभाउ माळी, वय 42 वर्षे, 4) अमर सुरेश पवार, वय 31 वर्षे, 5) गुरुनाथ उर्फ मिथुन रामलिंग शिंदे, वय 40 वर्षे, रा. येडशी, ता. जि. धाराशिवहे 20.00 वा. सु. सिकंदर बागवान यांचे विटभट्टी लगत दत्ता येलकर यांचे घरासमोर पत्रयाचे मोकळ्या जागेत तिरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 33,110 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान मुरुम पोलीसांनी दि.10.01.2024 रोजी 16.30 वा. सु. मुरुम पो. ठा. हद्दीत चिंचांली भु बसस्टॅड समोर पानटपरी मध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)संतोष बाबुराव बिराजदार, वय 40 वर्षे, रा. चिंचोली भु., ता. उमरगा जि. धाराशिवहे 16.30 वा. सु. चिंचांली भु बसस्टॅड समोर पानटपरी मध्ये कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 840 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.