वाशी – सर्वाधिक पत्रकारांची नाव नोंदणी असलेल्या व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नाव नोंदणी झालेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने आज राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांना पत्रकार भवनाची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
पत्रकारांचे हक्काचे ठिकाण म्हणजे पत्रकार भवन मात्र, वाशी तालुक्यात पत्रकार भवन नसल्याने पत्रकारांना आपल्या हक्काच्या ठिकाणापासून वंचित राहावे लागत आहे. पत्रकार दिन साजरा करावयाचा असल्यास किंवा पत्रकार परिषद घेण्यासाठी खाजगी ठिकाणी व्यवस्था करावी लागत असल्याने पत्रकारांतून वाशी येथे पत्रकार भवनाची मागणी होत असल्या कारणाने व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने मंगळवारी (दि.09) रोजी पालकमंत्री तानाजीराव सावंत यांना निवेदन देत पत्रकार भवनाची मागणी करण्यात आली.यावेळी व्हॉईस ऑफ मिडियाचे वाशी तालुकाध्यक्ष तथा डिजिटल विंग चे जिल्हाध्यक्ष वैभव पारवे, वाशी तालुका उपाध्यक्ष सचिन कोरडे, कार्याध्यक्ष विलास गपाट, संघटक शोएब काझी, विश्वनाथ जगदाळे, दत्ता भराटे, विक्रांत उंदरे यांच्यासह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.