धाराशिव : – ( Osmanabad to Dharashiv ) उस्मानाबाद नांमतरणाचा वादाचे प्रकरण मुंबई हायकोर्ट मध्ये सुरू आहे. याबाबत याचिकाकर्ते मसुद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील सुनावणी 22 जानेवारीला होणार आहे.
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे ( Osmanabad to Dharashiv )
नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास २९ जुन २०२२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
उस्मानाबाद हे नाव हैदराबाद संस्थानचा सातवा निजाम मीर उस्मान अली खान असफ जाह याने सत्ताग्रहण केल्यावर त्याच्या नावावरून ठेवण्यात आले. त्यानंतर २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाने उस्मानाबादचे नामांतर “धाराशिव” ( Osmanabad to Dharashiv ) असे पूर्ववत केले.
25 मे 1995 रोजी उस्मानाबादच्या नामांतराची ( Osmanabad to Dharashiv ) प्रथम घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केली होती. त्यानंतर युतीच्या काळात औरंगाबादमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तबही करण्यात आले होते. त्यानंतर दोन जणांनी या निर्णायाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून नामांतर ठरावास स्थगिती मिळविली होती. २०२० मध्ये पुन्हा नामांतर ठराव मंजूर करण्यात आला व हा वाद पुन्हा कोर्टात सुरू आहे.