धाराशिव दि.8 ):- जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस आज 8 जानेवारी रोजी पत्रकारांना वार्तांकन करण्यास प्रवेश देण्यात आला. त्याबद्दल सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांचा पत्रकारांच्याच्यावतीने आज 8 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथील पालकमंत्री कार्यालय येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
धाराशिव जिल्हा नियोजन समितीची सभा आज 8 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेण्यात आली.यापूर्वी पत्रकारांना या बैठकीस वार्तांकन करण्यास मनाई करण्यात आली होती.पत्रकारांनी यासाठी वारंवार पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना मागणी करून त्याबाबत पाठपुरावा केला होता.त्यामुळे पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत यांनी या वार्तांकनासाठी प्रवेश दिला.त्याबद्दल त्यांच्या संपर्क कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे, अमजद सय्यद,पांडुरंग मते,वैभव पारवे,कुंदन शिंदे,आसिफ मुलाणी, मुस्तफा पठाण,प्रशांत कावरे,सुधीर पवार व शाहरुख सय्यद आदींसह पत्रकार उपस्थित होते.