तुळजापूर : शहरातील तुळजामाता इंग्लिश मीडियम स्कूल मधील इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी जव्हेरिया जुबेर शेख हिने लहान वयातच उल्लेखनीय यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.ऑलिम्पियाड परीक्षेतील गणित विषयात तिने तब्बल 97.98% गुण मिळवत गोल्ड मेडल पटकावले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेच्या वतीने जव्हेरियाचा विशेष सत्कार करण्यात आला.शाळेचे प्राचार्य लोद मॅडम व राजेश जगताप सर यांच्या हस्ते तिला गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी शाळेतील शिक्षकवर्ग,विद्यार्थी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
जव्हेरिया ही वीर महाराष्ट्र न्यूज व सा.नेक्स्ट फ्रेमचे संपादक यांची मोठी मुलगी असून तिच्या यशामुळे शाळेसह तुळजापूर शहराचा अभिमान वाढला आहे. लहान वयातच गणित विषयात दाखवलेली तिची प्रावीण्य आणि मेहनत कौतुकास्पद असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
यावेळी उपस्थितांनी तसेच शेख परिवाराच्या वतिने जव्हेरियाचे अभिनंदन करत तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.