पदवीधर मतदार नोंदणी अभियानात सक्रिय सहभागाचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

Spread the love



धाराशिव – आगामी मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीसाठी पदवीधर मतदार नोंदणी अभियानास सुरुवात झाली आहे. या अभियानाद्वारे धाराशिव जिल्ह्यातील सुशिक्षित वर्गाने लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवून राज्याच्या धोरणनिर्मितीत आपला थेट वाटा उचलावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केले आहे. निवडणूक आयोगाने सन २०२६ मध्ये होणाऱ्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे.

या अनुषंगाने १ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे. धाराशिव जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली या आठ जिल्ह्यांतील १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी पदवी प्राप्त केलेले नागरिक नोंदणीस पात्र आहेत. धाराशिव भाजपच्या वतीने जिल्ह्यात, महाविद्यालयांत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे मार्गदर्शन आमदार राणाजगजीतसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर तसेच मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे मतदार प्रमुख आमदार संजयजी केनेकर व मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कौडगे करत आहेत. जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, युवक मोर्चा व महिला आघाडी पदाधिकारी एकत्रितपणे या अभियानात कार्यरत आहेत. नोंदणी प्रक्रिया संबंधित तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन पूर्ण करता येते. त्यासाठी पदवी प्रमाणपत्र, ओळखपत्र, आणि निवास दाखला सादर करावा लागतो. जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा आवश्यक सहकार्य करत असून, धाराशिव येथील भाजप जिल्हा कार्यालय प्रतिष्ठान भवन येथे मदत व मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करण्यात आल्याचे सांगितले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!