धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त भव्य धम्म रॅलीयुद्ध नको ,बुध्द हवा , घोषणांनी शहर दुमदुमले

Spread the love

धाराशिव दि.14 (प्रतिनिधी) – धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातून मंगळवार दि. 14 ऑक्टोबर रोजी तथागत गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेसह सजवलेला रथ आणि लेझीमच्या ताफ्यासह विविध घोषणा देत शहरात धम्म रॅली काढण्यात आली. या रॅलीस उपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

धाराशिव शहरात ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांस्कृतिक विभागाचे प्रदेश सरचिटणीस विशाल शिंगाडे यांच्यावतीने धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. धम्मचक्र दिनानिमित्त मागील तीन दिवसापासून व्याख्यान, धम्म देसना आदी कार्यक्रम घेण्यात आले.

 भीम नगर येथील क्रांती चौकातून या रॅलीचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन करण्यात आला. यावेळी गुणवंत सोनवणे ,अनिल बनसोडे ,महेंद्र  जेटिथोर,दिलीप सोनवणे,नायब सुभेदार अनुपकुमार शिरसाट, अर्चना विशाल शिंगाडे यांच्यासह आदी उपस्थित होते. ही  धम्म रॅली शासकीय जिल्हा रुग्णालय, मारवाड गल्ली, काळा मारुती चौक, पोस्ट कार्यालय, संत गाडगेबाबा चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत  काढण्यात आली. या रॅलीत हातामध्ये पंचशील, निळा ध्वज घेऊन उपासक सहभागी झाले होते.शेवटी त्रिशरण ,पंचशील वंदना घेण्यात येऊन रॅलीची सांगता करण्यात आली.

रॅलीत युद्ध नको ,बुद्ध हवा, उठा बंधुंनो जागे व्हा, बौद्ध धम्मचा स्वीकार करा.तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो आदी घोषणा देण्यात आल्या. या रॅलीच्या यशस्वितेसाठी सुगत सोनवणे, रणजीत माळाळे,  यश माळाळे , प्रसेनजित शिंगाडे, यश शिंगाडे, प्रशांत कांबळे, सारीपूत शिंगाडे, सुहास झेंडे,विश्वनाथ काळे, महेश शिंगाडे, अक्षय शिंगाडे ,कुणाल   माळाळे,सुदर्शन कांबळे,राजपाल गायकवाड, प्रदीप बनसोडे,अविनाश शिंगाडे, लहू बनसोडे, नाईकवाडी विकी, खुणे विकी, सम्राट वाघमारे, सम्राट कांबळे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!