तुळजापूरात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात धर्मवीर आनंद दिघे यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Spread the love

तुळजापूर – शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते, जनतेच्या मनातील खरा जननायक म्हणून ओळखले जाणारे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुळजापूर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या प्रसंगी तालुकाप्रमुख अमोल जाधव, पदाधिकारी संजय लोंढे,नितीन मस्के,रितेश जावळेकर, बाळू भैय्ये, सौरभ भोसले, मयुर कदम यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिघे साहेबांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांवर मनोगत व्यक्त केले. लोकसेवा, निष्ठा आणि शिवसेना बळकट करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

धर्मवीर आनंद दिघे यांनी पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि जनतेसाठी झटणारे नेतृत्व यामुळे ठाम छाप सोडली. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी “धर्मवीर दिघे अमर रहें” अशा घोषणांनी कार्यालय परिसर दुमदुमून टाकला.

शेवटी सर्व उपस्थितांनी आनंद दिघे यांच्या कार्याला चालना देण्याचा आणि शिवसेना बळकट करण्याचा संकल्प केला. पुण्यतिथी कार्यक्रमामुळे तुळजापूरात शिवसैनिकांमध्ये उत्साह आणि एकात्मतेचे वातावरण पाहायला मिळाले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!