घोडकी ते वाशी रस्त्यावरील वाहून गेलेल्या पिकांची व रस्त्याची केशव सावंत यांच्याकडून पाहणी व तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू.
वाशी (वार्ताहार) वाशी तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाची नुकसानीची पाहणी करण्यासाठी केशव सावंत यांनी आज वाशी तालुक्यातील घोडकी व दसमेगाव या गावांना भेट दिली.यावेळी घोडकी येथील साठवण तलावाच्या सांडव्यातून वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे घोडकी वाशीच्या रस्त्याच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात रस्ता सुरू करण्याच्या सुचना दिल्या.यावेळी तात्काळ रस्ता कामाला सुरवात करण्यात आली. तसेच दोन्ही गावाच्या शिवारातील व तालुक्यातील इतर ठिकाणी जाऊन पिकाची पाहणी करून वाशी तहसीलदारांना भेटून सरसकट नुकसानीचे पंचनामा करण्याच्या सुचना दिल्या.
तसेच वाशी तहसीलदारांना भेटून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत त्यांना तात्काळ मदत करण्यास सांगितले व ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी पाण्यामध्ये बुडून गेलेले आहेत त्यांना पण तात्काळ मदत करण्याच्या सुचना केल्या.यानुसार वाशी तहसीलदारांनी उद्या स्वतःत्या ठिकाणी जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.
वाशी तालुक्यामध्ये मागील आठ दिवसापासून पावसाने जोर धरलेला आहे,15 आणि 16 तारखेला वाशी तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पिकाचं नुकसान झालेलं आहे. अनेक ठिकाणी छोटे-मोठे तलाव भरून वाहू लागले आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये पिकाचे नुकसान झालेले आहे त्यामुळे सरसकट नुकसानीची पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना मदत मिळाली अशा सुचना तहसीलदारांना दिल्या.
यावेळी केशवसावंत यांच्या सोबत तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व गावातील शेतकरी उपस्थित होते.